तो जिवाच्या आकांताने पळत होता, एका दुकानात शिरला; तरीही टोळक्याने पाठलाग केलाच, थरार CCTV मध्ये कैद

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी बघता शहरात कोयता गॅंगचा पॅटर्न मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करत पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले जात आहे.

तो जिवाच्या आकांताने पळत होता, एका दुकानात शिरला; तरीही टोळक्याने पाठलाग केलाच, थरार CCTV मध्ये कैद
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 1:08 PM

नाशिक : पुण्यातील कोयता गॅंगचा गुन्हेगारांचा पॅटर्न नाशिकमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. अंबडसह सातपुर परिसरात गुन्हेगार सर्रासपणे कोयता हातात घेऊन दहशत माजवत आहे. त्यामुळे नाशिक शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. यामध्ये अंबड परिसरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये टपरीवर साहित्य घेण्यासाठी गेलेल्या मद्यपी युवकांनी पैसे देणे घेण्याच्या वादातून टपरी चालकावर धारदार चाकूने हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अंबडच्या सिमेन्स कंपनी समोर घडला आहे.

अंबडच्या सिमेन्स कंपनीच्या समोरील बाजूस एक टपरी चालकाकडे अज्ञात मद्यपान केलेले तीन ते चार युवक टपरीवर साहित्य खरेदी करण्यासाठी थांबले होते. यावेळी पैसे देणे घेण्यावरून वाद झाला, मद्यपान केलेल्या तरुणांनी थेट टपरी चालकावर धारदार चाकूने वार केले.

हे सुद्धा वाचा

यावेळी टपरी चालकाला वाचवण्यासाठी आलेल्या हार्डवेअर व्यावसायिकावरही हल्लेखोरांनी वार केले आहे. ही हल्ल्याच्या घटनेमुळे अन्य व्यवसायिक आणि ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी हल्लेखोरांना बेदम चोप दिला आहे.

या घटनेत हल्ले खोर तसेच ग्रामस्थ देखील जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अंबड पोलिसांनी ग्रामस्थ तसेच हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सातपुर परिसरात केक घेतल्यानंतर पैसे देण्यावरून सुरू असलेला वाद थेट कोयता उगरण्यापर्यन्त गेला होता. त्यातील सर्व आरोपी हे गुन्हेगरी पार्श्वभूमीचे असल्याचे समोर आले होते. तर त्यापूर्वी अंबड मधील एक व्हिडिओ समोर आला होता.

रात्रीच्या वेळेला परीसरात नागरिकांनी व्हिडिओ काढून शेयर केल्यावर खरंतर हा प्रकार समोर आला होता. फोनवर बोलत शिवीगाळ करणे, त्यानंतर रस्त्यावर कोयता आपटून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून नवे अधिकारी आता गुन्हेगरी रोखतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.