सलग दोन दिवस एकाच घरात चोरी, ऐन वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं
नाशिकच्या पिंपळ चौक परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये चोरी करत असतांना संशयित आरोपीसोबत दोन मुलींचा समावेश होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे संशयित आरोपी कैद झाले आहे.
नाशिक : नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीची संपूर्णं नाशिक शहरात चर्चा होत आहे. त्याचं कारण म्हणजे पिंपळचौक परिसरात एकाच घरात सलग दोन दिवस चोरी झाली आहे. जयश्री चंद्रकांत सांबरे यांच्या बंद घरात हा चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरातील हजारो रुपयांची पितळी भांडीसह इतर चोरीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनेने पोलिसही चक्रावले आहे. खरंतर जयश्री चंद्रकांत सांबरे या इतर ठिकाणी वास्तव्याला असून त्यांचे पिंपळ चौक येथील त्यांच्या घरी चोरी झाली आहे. त्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू असून या चोरीच्या घटनेत दोन मुलींचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या पिंपळ चौक परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये चोरी करत असतांना संशयित आरोपीसोबत दोन मुलींचा समावेश होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे संशयित आरोपी कैद झाले आहे.
पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने याबाबत घटनास्थळी पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा रात्रीच्या वेळी चोरी झाली आहे. पितळी भांडे, लोखंडी वस्तु आणि इतर जुनी भांडी वस्तु चोरी झाल्या आहेत.
या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी केली जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमांतून पोलिसांनी संशयित आरोपांचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे.
खरंतर भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली असून दोन दिवसांत एकाच घरात चोरी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांचा धाक शिल्लक राहिला नाही का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.