Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे अनेक डबे घसरले, रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी
एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे अनेक (Pawan Express) डबे रुळावरून घसल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या ट्रेनच्या भीषण (Railway Accident) अपघातात एकाच मृत्यू (Railway Accident Death) झाला आहे.
नाशिक : नाशिकमध्ये आज एक मोठा रेल्वे अपघात झालाय. कारण एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे अनेक (Pawan Express) डबे रुळावरून घसल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या ट्रेनच्या भीषण (Railway Accident) अपघातात एकाच मृत्यू (Railway Accident Death) झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत, जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. या अपघातानंतर अनेक गाड्याही रद्द कराव्या लागल्या आहेत. अनेक गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. या अपघातामुळे मनमाड पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली, असल्याची माहित देण्यात आलीय. एकूण तीन गाड्या रद्द करणयात आल्या आहेत, त्यात सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेसही या अपघातामुळे रद्द करण्यात आली आहे आणि अदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेसही रदद करण्यात आली आहे, अशी माहिती सेट्रेल रेल्वकडून देण्यात आली आहे.
कोणत्या नंबरवर मदत मागाल
रेल्वेकडून घटनेची माहिती
Few coaches of 11061 LTT-Jaynagar Express have been derailed between Lahavit and Devlali (near Nashik) on Dn line at around 15.10 hrs today, April 3. Accident relief train and medical van rushed to the spot. Details awaited: Central railway CPRO
— ANI (@ANI) April 3, 2022
अनेक गाड्या वळवल्या
Trains Update-3 Due to derailment of 11061 Express near Nashik. pic.twitter.com/3TBf2LbjRL
— Central Railway (@Central_Railway) April 3, 2022
या गाड्या रद्द
Trains Update-2 Due to derailment of 11061 Express near Nashik. pic.twitter.com/Mj89Qv0qMI
— Central Railway (@Central_Railway) April 3, 2022
हेल्पलाईनबाबत रेल्वेचे ट्विट
Trains Update-1 Due to derailment of 11061 Express near Nashik. pic.twitter.com/La95qUlF7J
— Central Railway (@Central_Railway) April 3, 2022
अनेकांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला
अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या ठिकाणी अजून वेगाने मदतकार्य सुरू आहे. गेल्या अनेक दिवसात रल्वे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहे. हा अपघात कसा झाला याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच रेल्वेतर्फे या अपघाताबाबत ठोस माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. या अपघाताने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवासांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला आहे.
Pune Crime | धक्कादायक! पुण्यात इमारतीच्या डक्टमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह
Pandharpur Crime : पंढरपूरमध्ये पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न