500 रुपयांच्या 291 बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; नाशिकच्या हायप्रोफाइल टोळीत चक्क महिला डॉक्टर!
नाशिक जिल्ह्यात 500 रुपयांच्या एक-दोन नव्हे, तर चक्क 291 बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायप्रोफाइल टोळीला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे यात एक महिला आरोपी डॉक्टर आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात 500 रुपयांच्या एक-दोन नव्हे, तर चक्क 291 बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायप्रोफाइल पाच जणांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे यात एक महिला आरोपी डॉक्टर आहे.
या हायप्रोफाइल बनवेगिरीची सविस्तर माहिती अशी की, बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जिल्ह्यात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संशयित पाचशे रुपयांच्या आणि एकूण एक लाख 45 हजार रुपये किंमत असलेल्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात होते. याची कुणकुण लागताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. त्यांना हाती लागलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन संशयितावर पाळत ठेवली. त्यानंतर लासगावचे मोहन बाबुराव पाटील, डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ (रा. बोराडे हॉस्पिटलजवळ, लासलगाव) आणि विठ्ठल नाबरिया (रा. कृषीनगर, कोटमगाव रोड, लासलगाव) यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांचा प्लॅन ऐकुण पोलीसही चाट पडले. या माहितीतूनच त्यांना रवींद्र हिरामण राऊत (रा. स्मारक नगर, पेठ) आणि विनोद पटेल (रा. पंचवटी, नाशिक) हे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन येणार असल्याचे कळले. ते दोघे या नोटा मोहन पाटील व डॉ. प्रतिभा घायाळ यांना देणार होते. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणानुसार येवलारोड विंचूर येथे मोहन पाटील, डॉ. प्रतिभा पाटील आणि विठ्ठल नावरिया यांना पाठवले. तेव्हा रवींद्र हिरामण राऊत, विनोदभाई पटेल हे त्यांची चारचाकी गाडी घेऊन आले. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष छापा मारला. तेव्हा आरोपींकडे पाचशे रुपयांच्या 291 बनावट नोटा सापडल्या. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात कलम 489 नुसार गुन्हा दाखल करून पाच जणांना बेड्या ठेकून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या पथकाने केली कारवाई
बनावट नोटाचा भांडाफोड करण्याची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अहिरे, पोलीस हवालदार बाळू सांगळे, पोलीस नाईक कैलास महाजन, योगेश शिंदे, संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, गणेश बागुल, कैलास मानकर, सागर आरोटे, देविदास पानसरे, महिला पोलीस शिपाई मनीषा शिंदे यांच्या पथकाने केली. या बनावट नोटाची पाळेमुळे कुठेपर्यंत रुजली आहेत, याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.
इतर बातम्याः
Airport Look | नेहमीप्रमाणेच कूल आणि फंकी अवतारात विमानतळावर दिसला रणवीर सिंह, पाहा फोटो…#RanveerSingh | #AirportLook | #Entertainment https://t.co/hyECjDUcNT
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2021