Conversion | रकीबुलने तीनवेळा ‘कुबूल है’ बोलायला लावलं, नॅशनल लेव्हल शूटर तारा शाहदेवचा भयानक अनुभव

Conversion | लग्नाच्या पहिल्या रात्री 20-25 हाजींना बोलावलं व जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं. ताराला इस्लाम स्वीकारायला भाग पाडणाऱ्या रकीबुलला काय शिक्षा झाली?

Conversion | रकीबुलने तीनवेळा ‘कुबूल है’ बोलायला लावलं, नॅशनल लेव्हल शूटर तारा शाहदेवचा भयानक अनुभव
tara shahdev forced conversion case
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 8:46 PM

रांची : सीबीआय कोर्टाने नॅशनल शूटर तारा शाहदेवच्या जबरदस्ती धर्म परिवर्तन प्रकरणात दोषी रकीबुल ऊर्फ रंजीत कोहलीला शिक्षा सुनावलीय. त्याचवेळी रकीबुलची आई कौसर रानीला दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे कारस्थान रचणारा आरोपी मुस्ताक अहमदला 15 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नॅशनल शूटर तारा शाहदेव झारखंड रांचीची राहणारी आहे. तिने 2014 साली मुस्लिम व्यक्ती रकीबुल ऊर्फ रंजीत सिंह कोहली बरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर कोहलीने ताराला धमकी दिली. तिला त्रास दिला. धर्म परिवर्तनासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. रकीबुलला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ताराने 2015 साली झारखंड हायकोर्टात एक याचिका दाखल केली. तिने पती आणि त्याच्या कुटुंबावर जबरदस्ती धर्म परिवर्तन आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. लग्नाआधी कोहलीने तारापासून आपला धर्म लपवला होता. सीबीआयच्या तपासातून ही माहिती समोर आली. लग्नानंतर त्याने ताराला धमकावलं. तिला त्रास दिला व तिला जबरदस्ती धर्म परिवर्तनासाठी भाग पाडलं. सीबीआयने कोहली, त्याची आई कौशल रानी आणि झारखंड हायकोर्टाचे माजी रजिस्ट्रार मुश्ताक अहमद यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.

‘मी हिंदू नाही हे बोलायला भाग पाडलं’

रकीबुलने एक महिना ताराला बंधक बनवून ठेवलं. तिला जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं. तिच नाव बदलून सारा ठेवलं. ताराने तिच नाव बदलण्याला विरोध केला. रकीबुल तिला कोणाला भेटू देत नव्हता. त्याने मारहाणीची धमकी दिली. इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर गोळी मारण्याची धमकी दिली. ताराने त्यावेळी पोलिसांना सांगितलं की, त्यावेळी तीनवेळा मला ‘कुबूल है’ बोलण्यासाठी भाग पाडलं. मी धर्म बदलला, त्यामुळे मी हिंदू नाही हे बोलायला भाग पाडलं, असं ताराने त्यावेळी पोलिसांना सांगितलं होतं. ‘लग्नाच्या पहिल्या रात्री 20-25 हाजींना बोलावलं’

ताराची शूटिंग ग्राऊंडवर रंजीत बरोबर ओळख झाली होती. तिथे रंजीत रोज तिची प्रॅक्टिस बघण्यासाठी यायचा. हळू-हळू दोघे बाहेर भेटू लागले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 7 जुलै 2014 रोजी लग्न केलं. आपण मुस्लिम आहोत, ते रंजीतने तारापासून लपवून ठेवलं. त्याने आपली खोटी ओळख सांगितली. लग्नाच्या पहिल्या रात्री 20-25 हाजींना बोलावलं व जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.