Navi Mumbai Fraud : सतेज पाटलांचा पी.ए. असल्याचे भासवून 10 लाखांची फसवणूक, 5 कोटींचं कर्ज देण्याच्या बाहण्याने घातला गंडा

या भामट्याने सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा P.A असल्याचे फोनकरून भासविले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा 34,420 कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai Fraud : सतेज पाटलांचा पी.ए. असल्याचे भासवून 10 लाखांची फसवणूक, 5 कोटींचं कर्ज देण्याच्या बाहण्याने घातला गंडा
सतेज पाटलांचा पी.ए. असल्याचे भासवून 10 लाखांची फसवणूकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 12:36 AM

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या (Navi Mumbai Crime) कामोठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच कोटींचे लोन (Loan) देण्याच्या बहाण्याने 10 लाखांची फसवणूक (Financial Fraud) झाली आहे. यात मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नावाचा वापर करत ही फसवणूक केली गेली आहे. तसेच या भामट्याने बंटी पाटील यांचा P.A असल्याचे सांगून हा गंडा घातला आहे. आता मात्र लोन मिळवून देणारा फरार झाला आहे. तसेच त्याचा पत्ता आणि नावही खोटे असल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक करणारा विनायक रामगुडे उर्फ विनायक पाटील हा आता फरार झाला आहे. या भामट्याने सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा P.A असल्याचे फोनकरून भासविले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा 34,420 कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराने सध्या नवी मुंबईत खळबळ माजली आहे. या भामट्याचा शोध सध्या नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

नेत्यांची नावं घेऊन आधीही फसवणूक

एखाद्या नेत्याच्या नावाने फसवणूक होण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. मागेही पुण्यात असेच एक प्रकरण समोर आलं होतं ज्यात अजित पवार यांच्या नावाचा वापर केला होता. तसेच अजित पवार यांच्या सचिवाच्या मोबाईल नंबरचाही वापर करून खंडणी मागितली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने पाऊलं उचलत या भामट्याला बेड्या ठोकल्या होत्या. हे प्रकरणही राज्यभर गाजलं होतं. एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव घेऊन फसवणूक केल्यास अशी प्रकरण पोलिसांकडूनही तात्काळ हातळली जातात. त्यामुळे याही प्रकरणाचा छडा लवकरच लागण्याची शक्यता आहे.

अशा फसवणुकांपासून सावध राहा

यात गोष्ट ही सर्वांचं लक्ष वेधून घेते म्हणजे या भामट्याने फसवणूक करण्याकरिता समोरच्याला तब्बल पाच कोटी रुपये लोन मिळवून देतो असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाला बळी पडूनच त्याने फिर्यादीकडून तगडी रक्कम वसूल केली आहे. आपल्याला एखादं काम करण्यासाठी माझ्या हा नेता ओळखीचा आहे, हा माझा नातेवाईक आहे, अशी अनेक उदाहरणं दिली जातात. काही लोक काम लवकर होण्यासाठी किंवा सोईस्कर म्हणून याही मार्गाच अवलंब करतात मात्र मुख्य गफलत ही याच ठिकाणी होते आणि असे फसवणुकीचे प्रकार समोर येतात. मात्र अशा भामट्यांना वेळीच ओळखून लांब राहिल्यास असे प्रकार टाळणे शक्य असते. त्यासाठी नागरिकांनीही तेवढेच सतर्क असले पाहिजे, आपण सतर्क असल्यास नंतर होणारा मनस्तापही टाळता येतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.