ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स; राष्ट्रवादीवर संक्रात?

| Updated on: Jan 13, 2021 | 12:30 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. (Nawab Malik’s son-in-law summoned in drugs case)

ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स; राष्ट्रवादीवर संक्रात?
नवाब मलिक
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Nawab Malik’s son-in-law summoned in drugs case)

नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचं सांगितलं जातं.

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीवर संक्रात

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे झालेले आरोप ताजे असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकापाठोपाठ एक अशा दोन प्रकरणात अडकल्याने राष्ट्रवादीवर राजकीय संक्रात ओढावल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडेच राज्याचे गृहखाते असल्याने या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काय कारवाई करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Nawab Malik’s son-in-law summoned in drugs case)

 

संबंधित बातम्या:

सरकारवर कोणताही दबाव नाही; लवकरच सत्य बाहेर येईल: नवाब मलिक

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडी आक्रमक

धनंजय मुंडेंच्या कबुलीनाम्यावर परळीकर काय म्हणतायत?

(Nawab Malik’s son-in-law summoned in drugs case)