भाजप नेत्याचं आधी अपहरण, नंतर निर्घृणपणे संपवलं, धक्कादायक घटना

भाजप नेत्याच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याचं आधी अपहरण केलं. त्यानंतर भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या केली.

भाजप नेत्याचं आधी अपहरण, नंतर निर्घृणपणे संपवलं, धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 7:41 PM

रायपूर | 7 मार्च 2024 : छत्तीसगढच्या बिजापूर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजापूर येथे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी अतिशय घृणास्पद कृत्य केलं आहे. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा एका भाजप नेत्याची हत्या केली आहे. भाजप नेते कैलाश नाग यांची नक्षलवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. कैलाश नाग हे भाजप व्यापारी सेलचे मंडळ उपाध्यक्ष होते. नक्षलवाद्यांनी त्यांचं आधी अपहरण केलं. त्यानंतर त्यांनी कैलाश नाग यांची कुऱ्हाडीने हत्या केली. या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही जांगला पोलीस ठाणे हद्दीत घडली.

जांगला पोलीस ठाण्यापासून केवळ 12 किमी अंतरावर कोटामेट्टा परिसरात संबंधित घटना घडली आहे. या परिसरात वन विभागाकडून तलाव बनवण्याचं काम सुरु आहे. काम सुरु असतानाच बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास या ठिकाणी काही नक्षलवादी आले. नक्षलवाद्यांनी सर्वात आधी तलाव बनवण्यासाठी काम करत असलेल्या जेसीबीला आग लावून जाळून टाकलं. त्यानंतर जेसीबीचे मालक कैलाश नाग यांचं अपहरण केलं.

नक्षलवादी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कैलाश नाग यांचं अपहरण केल्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वार करत त्यांचा खून केला. त्यांनी हत्या करुन मृतदेह फेकून दिला. त्यानंतर नक्षलवादी तिथून पळून गेले. कैलाश नाग यांचं वय जवळपास 40 वर्ष इतकं होतं. ते ठेकेदारीचं काम करायचे. ते भाजप पक्षाचे नेतेदेखील होते. त्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्येदेखील भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत. हत्या झालेल्या परिसरात पोलिसांची गस्ती वाढवण्यात आली आहे.

छत्तीसगडमध्ये एका वर्षात 9 भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरापासून भाजपच्या 9 नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. यावर्षी भाजपच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेवर भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. भाजप नेत्यांनी आरोपी नक्षलवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.