बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?

मुंबईतील मोठे पब त्याचप्रमाणे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांना शादाब ड्रग्स सप्लाय करायचा | Shadab Batata

बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?
फारुख बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया आहे.
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 8:06 AM

मुंबई: अमलीपदार्थ विरोधी कक्षाने (NCB) शुक्रवारी केलेल्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला अटक केली. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटासह (Shadab Batata) अन्य एकाला अटक करून, 2 कोटी पेक्षा जास्त किंमतीचे एमडी ड्रग्ज, एक फॉर्च्युनर, एक i20, आणि एक बलोनो अशा 3 कार जप्त केल्या आहेत. एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. (NCB arrests drug peddler Shadab Batata)

एनसीबीने अटक केलेला शादाब हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया फारुख बटाटा याचा मुलगा आहे. मुंबईतील मोठे पब त्याचप्रमाणे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांना शादाब ड्रग्स सप्लाय करायचा असा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

शादाब बटाटा आणि शाहरुख खान एलियास उर्फ शाहरुख बुलेट (कोड नेम- बुलेट राजा) असे अटक केलेल्या ड्रग्स माफियांची नाव आहेत. शादाब बटाटा हा फारुख बटाटा यांचा मुलगा असून फारुख बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया आहे. एनसीबीने शादाबला मिरारोड येथून तर शाहरुखला वर्सोवा येथून ताब्यात घेतले. त्यावेळी शादाबच्या घरी 1.60 ग्रॅम MD, 61 मेफेड्रोनही जप्त करण्यात आले.

झोपडपट्टीत राहणाऱ्या शाहरुखची अलिशान लाईफस्टाईल

शाहरुख खान एलियास उर्फ शाहरुख बुलेट याला एनसीबीने अंधेरीच्या कासम नगरमधून ताब्यात घेतले. यावेळी ड्रग्ज तस्करीतून सुरु असलेली अलिशान लाईफस्टाईल समोर आली. या कारवाईत एनसीबीने अनेक गाड्या, विदेशी चलन, ड्रग्ज आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले.

एनसीबीची कारवाई

एनसीबीची झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी एक विशेष टीम बनवली आहे.या टीम मार्फत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याच्या गँगच्या मागावर एनसीबीची टीम होती. समीर वानखेडे यांच्या एनसीबीची यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबी अधिकाऱ्यांनी काल रात्री तीन ठिकाणी मोठी कारवाई केली. लोखंडवला,वर्सोवा आणि मीरा रोडया विभागात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या.या धाडीत दोन कोटी रुपयांच एमडी ड्रग्स जप्त केले आहे.

कोण आहे फारुख बटाटा?

शादाब बटाटा हा फारूक शेख उर्फ फारुख बटाटा याचा मुलगा आहे. फारुख बटाटा हा जेव्हा सुरुवातीला मुंबईत आला तेव्हा तो बटाटा विकायचा. यामुळे त्याचं नाव फारुख बटाटा अस झालं. बटाटे विकता विकता फारुख मुंबईत ड्रग्स विकणाऱ्या गँगस्टर यांच्या संपर्कात आला. आणि मग तो ही ड्रग्स विकू लागला.  गेल्या काही वर्षात तो ड्रग्जचा मोठा व्यापारी झाला.

मुंबईत देशभरातून त्याचप्रमाणे परदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी होत असते. हे ड्रग्स फारूक बटाटा याच्याकडे उतरत असत. त्यानंतर ते ड्रग्स फारुख गँगची लोकं इतरत्र वितरित करत असतात. प्रामुख्याने बड्स , गांजा ,एल एस डी , एम डी या ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी फारुख ओळखला जातो.

(NCB arrests drug peddler Shadab Batata)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.