व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग महत्त्वाचा पुरावा, अनन्या पांडेचा जबाब एनसीबी कोर्टासमोर ठेवणार, आर्यनच्या जामिनाला करणार विरोध

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टीमध्ये कोठडीत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनाला एनसीबी विरोध करणार आहे. जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी आर्यन खान तसेच अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यात झालेली व्हॉट्सअॅप चॅट आणि अनन्याचा जबाब न्यायालयात सादर केला जाणार आहे.

व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग महत्त्वाचा पुरावा, अनन्या पांडेचा जबाब एनसीबी कोर्टासमोर ठेवणार, आर्यनच्या जामिनाला करणार विरोध
आर्यनच्या अटकेनंतर इतर स्टार्सना सतावतेय आपल्या मुलांची चिंता
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 6:43 PM

मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टीमध्ये कोठडीत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनाला एनसीबी विरोध करणार आहे. जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी आर्यन खान तसेच अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यात झालेली व्हॉट्सअॅप चॅट आणि अनन्याचा जबाब न्यायालयात सादर केला जाणार आहे.

एनसीबी अनन्याचा जबाब कोर्टात सादर करणार 

आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीला मंगळवारी न्यायालयाला उत्तर द्यायचे आहे. यावेळी उत्तराध्ये एनसीबी आर्यन खान आणि अनन्या या दोघांमध्ये झालेली व्हॉट्सअॅप चॅटिंग सादर करणार आहे. तसेच अनन्याने चौकशीमध्ये दिलेली माहिती तिचा जबाब म्हणून कोर्टात सादर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेला सोमवारीदेखील चौकशीसाठी बोलावलं आहे. यावेळी तिचा जो जबाब नोंदवला जाणार आहे, तो देखील हायकोर्टात सादर केला जाईल. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून एनसीबी आर्यन खानच्या जामिनाला विरोध करणार आहे.

व्हॉट्सअ‌ॅप संवाद महत्त्वाचा पुरावा ठरणार

आर्यन खान तसेच अनन्या पांडे यांच्यामध्ये गांजा उपलब्ध खरुन देण्याविषयी चर्चा झाली होती. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ही सर्व चर्चा झाली होती. एनसीबीने या चॅटिंगसंदर्भात अनन्याची चौकशी केली. त्यानंतर दोघांमधील हीच चॅटिंग एनसीबीसाठी महात्त्वाचा पुरावा ठरणार आहे. या संवादामुळे आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आर्यनचा जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज

याआधी आर्यन खानने मुंबई सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी एनसीबीने आर्यन आणि अनन्या पांडे यांच्यातील व्हाट्सएप संवाद सादर केला होता. ड्रग्सच्या मागणीबाबत हा संवाद असल्यामुळे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आता आर्यनने जामिनासाठी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज केलेला आहे. यावेळीदेखील पुन्हा अनन्या पांडेचा व्हॉट्सअॅप संवाद आणि जबाब आर्यनविरोधात महत्वाचा पुरावा ठरेल असं एनसीबी वाटत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.

इतर बातम्या :

संजय राऊतांचा आधी अमित शहांना खोचक सल्ला, आता राणे म्हणतात तुम्ही काश्मीरला जाऊन तरी दाखवा

Raj Thackeray Corona Positive | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

अजितदादांनी जाहीर केलेल्या सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा; चंद्रकांत पाटलांनी ललकारले

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.