हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जामीनावर सुटका; शिंदे गटाचे आमदार असलेल्या हॉटेलमध्ये लपले होते

सोनिया दोहन आणि श्रेयस कोतियाल अशी दोघांची नाव आहेत. शिंदे गटाच्या आमदारांच वास्तव्य असलेल्या गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेल मध्ये ओळख लपवून राहणाऱ्या दोघांना पंजिम पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पंजिम पोलिसांनी दोघां वर कारवाई केली होती. दरम्यान आज न्यायालयाने प्रत्येकी 20 हजारांच्या जातमुचलक्यावर सोनिया दोहन आणि श्रेय कोथियाल या दोघांचीही जामिनावर मुक्तता केली आहे.

हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जामीनावर सुटका; शिंदे गटाचे आमदार असलेल्या हॉटेलमध्ये लपले होते
हॉटेलमधून पोलिसांनी तिघांना अटक केली
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 8:15 PM

मुंबई : सुरत, गुवाहाटी,गोवा आणि मुंबई असा प्रवास करत बंडखोर एकनाथ शिंदे(Eknath shinde) गटाचे आमदार थेट अधिवेशनात पोहचले. त्यांच्या या प्रवासा दरम्यान त्यांची हेरगिरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे(NCP) कार्यकर्ते ही हेरगिरी करत होते. या अटक कार्यकर्त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.

सोनिया दोहन आणि श्रेयस कोतियाल अशी दोघांची नाव आहेत. शिंदे गटाच्या आमदारांच वास्तव्य असलेल्या गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेल मध्ये ओळख लपवून राहणाऱ्या दोघांना पंजिम पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पंजिम पोलिसांनी दोघां वर कारवाई केली होती. दरम्यान आज न्यायालयाने प्रत्येकी 20 हजारांच्या जातमुचलक्यावर सोनिया दोहन आणि श्रेय कोथियाल या दोघांचीही जामिनावर मुक्तता केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत राजकीय भूकंप केला होता. शिंदे यांनी शिवसेनेसह अपक्ष असे 50 पेक्षा अधिक आमदार सोबत नेले होते.

…तर चार्टर्ड विमानाने आमदारांना परत पाठवलं असतं!’ थेट सभागृहातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं!

या आमदारांना सुरत, गुवाहाटीमार्गे गोव्याला नेले होते.   2 जुलै रोजी तब्बल ११ दिवसांनंतर हे बंडखोर आमदार विमानाद्वारे मुंबईत परतले.  बंडामध्ये सहभागी झालेले सर्वच आमदार नाराज असे नाही तर काहीजण हे दबावात आहेत. ते (Shivsena) शिवसेनेशी संपर्क करीत असल्याचे केवळ खा. संजय राऊत यांनीच नव्हे तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले होते. मात्र, अशा अफवा पसरुन संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात होते. प्रत्यक्षात सर्वच आमदारांमध्ये नाराजी होती. आणि बळजबरीने आले असते तर त्यांना चार्टर्ड विमानाने परत पाठविले असते असे म्हणत (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनाच डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारांवर बळजबरी हे तर दूरच पण अनेक आमदारांच्या मनातील गोष्ट यामधून घडली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले आहे.

बंडाला आमदारांचाच पाठिंबा

बंडखोर आमदारांवर कोणता दबावच नव्हता शिवाय तशी परस्थिती देखील निर्माण झाली नव्हती. उलट गटामध्ये सहभागी होणारा प्रत्येक आमदार हा आनंदात होता. आमदारांचा सत्तेतून बाहेर पडण्याचे कारण आणि उद्देश हा स्पष्ट असल्याने दिवसाकाठी बंडखोरांची संख्या ही वाढतच गेली. शिवाय कोणी नाराज असते तर त्या आमदाराच्या परतीची सर्व सोय केली असती. एवढेच नाहीतर चार्टर्ड विमानाने त्यांना परत पाठविले असते असेही शिंदे यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.