कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट
"एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही" असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.
नवाब मलिक काय म्हणाले?
“एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल. मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?” असंही नवाब मलिक म्हणाले.
नवाब मलिकांकडून प्रश्नांची सरबत्ती
“काही फोटो एनसीबीने जारी केले आहेत, त्यात काही अंमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आले आहेत, हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे आहेत. के पी गोसावी यांचा झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, मनिष भानुशाली यांचा संबंध काय? खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली? त्यांना काही अधिकार आहेत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.
“भाजपकडून बॉलिवूड-राज्य सरकारची बदनामी”
भाजप बॉलिवूड, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. 21 तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर 22 तारखेला गांधीनगर भागात होता, 21-22 तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडलं. त्यामुळे 28 तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता, कुठल्या मंत्र्यांना भेटला, याचं उत्तर एनसीबीनं द्यावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
पाहा नवाब मलिक यांची संपूर्ण पत्रकार परिषद :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण https://t.co/ngDLcs3jyh
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 6, 2021
एनसीबीकडून दावा निकाली
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) स्पष्टपणे सांगते की आर्यन खानसोबतच्या या फोटोतील व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नाही, असं ट्वीट एएनआयने केलं होतं
Narcotics Control Bureau (NCB) categorically clarifies that the man in this picture with Aryan Khan is not an officer or employee of NCB pic.twitter.com/jGqjWMTvsi
— ANI (@ANI) October 3, 2021
संबंधित बातम्या :