sulli deal : “सुल्ली डिल” प्रकरणातील आरोपीची पोलिसांनाच धमकी, प्रकरण काय? वाचा सविस्तर

पोलिसांनी धाडसत्र टाकत नीरज बिष्णोई याला अटक केली, मात्र आता त्याने पोलिसांना कोठडीत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

sulli deal : सुल्ली डिल प्रकरणातील आरोपीची पोलिसांनाच धमकी, प्रकरण काय? वाचा सविस्तर
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 7:48 PM

“सुल्ली डिल” अॅप बनवणारा नीरज बिष्णोई सध्या पोलीस कोठडीत आहे, मुस्लिम महिलांबद्दल आरक्षेपार्ह पोस्ट या अॅपवर केल्या जात होत्या, या अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो टाकून, त्यांची किंमत ठरवली जात असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता, त्यानंतर राज्य शासन आणि महिला आयोगाकडून या प्रकरणाची तातडीने दखल घेत, गृहमंत्र्यांनी याप्रकरणी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी धाडसत्र टाकत नीरज बिष्णोई याला अटक केली, मात्र आता त्याने पोलिसांना कोठडीत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

नीरज बिष्णोईला आसाममधून अटक

नीरज बिष्णोई याला आसाम राज्यातून अटक करण्यात आली आहे, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने याच्या मुसक्या आवळ्या आहेत, या प्रकरणी तो गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. यावेळी तो तपासात सहकार्य करत नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कोठडीत असताना त्याने दोनदा स्वतःच स्वतःवर जखमा करण्याचा प्रयत्न केला, असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले

या कोठडीत स्वतला इजा पोहचवून आत्महत्येचाही प्रयत्न केला. मात्र , दिल्ली पोलिसांनी वेळीच त्याला रोखलं, त्याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले होते, डॉक्टरांनी त्याची तब्येत ठिक असल्याचे सांगितले आहे. आत्महत्येची नाटकं करून तो हे सर्व तपासापासून पळ करण्यासाठी तर करत नाही ना , याबाबत दिल्ली पोलीस विचार करत आहेत. मात्र, त्याच्या या कृत्याने तपासात अडचणी निर्माण होत आहे. नीरज बिष्णोई हा सराईत सायबर गुन्हेगार आहे. याने गटाने यापूर्वीही असेच प्रकार केले आहेत. वयाच्या 15 व्या वर्षापासून तो हे करत आहे, शाळांच्या वेबसाईट हॅक करणे हे त्याचं नेहमीचे कांड आहे.याने पाकिस्तानच्या काही वेबसाईटही हॅक केल्या आहेत, असा संशय पोलिसांना आहे.

Maharashtra Corona | महाराष्ट्रात नव्या कोरोना निर्बधांची घोषणा होण्याची शक्यता

‘अनप्लग्ड’ टाटा: चरित्रातून जीवनपट लवकरच जगासमोर, पुस्तकासाठी महागडा लेखन करार!

जॅकलिन, सुकेशचा फोटो पुन्हा व्हायरल, चर्चेला उधान; कोण आहे मनी लाँडरिंग प्रकरणात आरोप झालेला सुकेश चंद्रशेखर?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.