सहा महिन्यांपूर्वी लग्न, तीन महिन्यांच्या गर्भवतीचा संशयास्पद मृत्यू, भाऊ म्हणतो शेवटच्या फोनवर ती..

सपनाचा भाऊ इशांतने सांगितले की, या वर्षी एप्रिल महिन्यात त्याच्या बहिणीचे लग्न विशालसोबत झाले होते. लग्नानंतर तिचे सासरचे बहिणीवर हुंड्यासाठी दबाव टाकत होते. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याबद्दल ते आपल्या बहिणीला मारहाण करत असत.

सहा महिन्यांपूर्वी लग्न, तीन महिन्यांच्या गर्भवतीचा संशयास्पद मृत्यू, भाऊ म्हणतो शेवटच्या फोनवर ती..
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 9:42 AM

नवी द‍िल्‍ली : दिल्लीच्या शाहदरा पोलीस स्टेशन अंतर्गत बलबीर नगर परिसरात तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृत सपनाच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हुंडाबळीचा आरोप केला आहे. त्याचवेळी, सासरच्या मंडळींकडून सुनेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस गुन्हा दाखल करुन आणि सपनाचा पती विशाल याची चौकशी करुन या प्रकरणाचा तपास करत आहे.

काय आहे प्रकरण?

सपनाचा भाऊ इशांतने सांगितले की, या वर्षी एप्रिल महिन्यात त्याच्या बहिणीचे लग्न विशालसोबत झाले होते. लग्नानंतर तिचे सासरचे बहिणीवर हुंड्यासाठी दबाव टाकत होते. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याबद्दल ते आपल्या बहिणीला मारहाण करत असत. सपना तीन महिन्यांची गर्भवती असल्याचंही त्याने सांगितलं.

नेमकं काय घडलं?

सपनाच्या भावाचे म्हणणे आहे की मंगळवारी दुपारी एक वाजता ती आपल्या आईशी फोनवर बोलली. ती अस्वस्थ दिसत होती. मागून भांडणाचे आवाज येत होते. अडीच वाजताच्या सुमारास तिच्या सासरच्या लोकांनी फोन करून सांगितले की सपनाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जेव्हा माहेरचे कुटुंब सपनाच्या सासरच्या घरी बलबीर नगरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी सपनाचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहिला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशात गर्भवतीची आत्महत्या

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये जलनपूर येथे एका गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. विवाहितेने जीव देण्यापूर्वी तिच्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. यामध्ये तिने आपली व्यथा मांडत आत्महत्या करण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागितली होती. धक्कादायक बाब म्हणजे या ऑडिओमध्ये तिने आपल्या भावाला सासरच्या लोकांवर कोणतीही कारवाई करु नका, असेही सांगितले.

काय आहे प्रकरण?

बिजनौरच्या सबदलपूर येथील रहिवासी ओमप्रकाश यांनी आपली कन्या पूजाचे लग्न 10 महिन्यांपूर्वी जलीलपूरमधील खानपूर खादर येथील रहिवासी संजीव याच्याशी लावले होते. ओमप्रकाश यांनी लेकीच्या लग्नात कारही दिली होती. लग्नापूर्वी ओमप्रकाश यांना सांगण्यात आले होते, की जावई संजीव रेल्वेमध्ये तिकीट पर्यवेक्षक आहे. पण लग्नानंतर तो बेरोजगार असल्याचे समजले. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

लग्नानंतर हुंड्यासाठी छळ

पूजाच्या लग्नानंतरही तिच्या सासरी हुंड्याची मागणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. हुंड्यासाठी तिला सातत्याने त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पूजाच्या माहेरच्यांनी ती 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. पूजाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 5 दिवसांपूर्वी हुंड्यावरील वादानंतर ते संजीवच्या घरी त्याच्याशी बोलण्यासाठीही आले होते. तेव्हाही दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता.

पूजाच्या ऑडिओ क्लीपमध्ये काय?

पूजाने तिचा भाऊ राजनला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. त्यात ती म्हणाली होती की, “दादा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे. पण आज मी हे पाऊल नाईलाजाने उचलत आहे. तू आपल्या आई-बाबांना समजावून सांग. माझ्या सासरच्या घरातून कोणतीही वस्तू परत घेऊ नका, एक चमचाही नाही. जेव्हा तुमची बहीणच राहणार नाही, तेव्हा त्या घराशी काय संबंध असेल?” एवढेच नाही तर पूजा म्हणाली, “माझ्या सासरच्यांवरही कोणतीही कारवाई करू नका. त्यांना क्षमा करा”

पूजा सासरच्या मंडळींवर गुन्हा

दरम्यान, पूजाचे वडील ओमप्रकाश यांनी हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. यानंतर पोलिसांनी पूजाच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या :

प्लीज आई-बाबांना समजव, भावाला ऑडिओ मेसेज पाठवून गर्भवतीची आत्महत्या

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

सासूच्या हत्येची फिर्याद देणारी सूनच निघाली खूनी, जमिनीसाठी दोरीने गळा आवळून हत्या

ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख आणण्याचा तगादा, गर्भवती सुनेचा गळा आवळून खून

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.