AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Crime : गँगरेपने राजधानी पुन्हा हादरली! नवी दिल्ली रेल्वे स्थानकात सामूहिक बलात्कार, रेल्वे कर्मचाऱ्यांचं हैवानी कृत्य

Delhi Gang Rape Case : 21 जुलैच्या मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास चार जणांनी मिळून हैवानी कृत्य केलं

Delhi Crime : गँगरेपने राजधानी पुन्हा हादरली! नवी दिल्ली रेल्वे स्थानकात सामूहिक बलात्कार, रेल्वे कर्मचाऱ्यांचं हैवानी कृत्य
नवी दिल्लीतील धक्कादायक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 10:57 AM

नवी दिल्लीतून सामूहिक बलात्काराची (New Delhi Gang Rape News) संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे दिल्ली (Delhi Police News) पुन्हा एकदा हादरलंय. 21 जुलै रोजी ही घटना घडल्याचं कळतंय. या बलात्कार प्रकरणी चार नराधमांना अटक (Accused Arrested) करण्यात आली असून पुढील तपास केला जातोय. नवी दिल्ली रेल्वे स्थानकात बनवण्यात आलेल्या फुटओव्हर ब्रीजच्या खालच्या बाजूल बलात्काराची धक्कादायक घटना घडली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण पीडित तरुणीच्या ओळखीचाच व्यक्ती होता, अशीही माहिती समोर आली आहे. एका 30 वर्षांच्या तरुणीवर गुरुवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील एका कर्मचाऱ्यानेच हे संतापजनक कृत्य केलं. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोप हे रेल्वेचे कर्मचारी आहे. रेल्वेच्या इलेक्ट्रीक विभागात ते काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे. रेल्वे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी या संतापजनक घटनेची माहिती दिली आहे. दिल्लीत घडलेल्या या घटनेनं राजधानीमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

कळलं कसं?

ही घटना 21 जुलै रोजी घडली. 21 जुलैच्या मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास चार जणांनी मिळून हैवानी कृत्य केलं. ट्रेन लाईटिंग हटमध्ये चौघांनी मिळाली तीन वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केला. फोन करुन महिलेनं आपल्यावर बलात्कार झाल्याच्या वृत्ताची माहिती दिली. आपल्यासोबत दोघा जणांनी मिळून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला होता. अडीच वाजण्याच्या सुमारास एका फोन कॉलवरुन पोलिसांनी याबाबतची माहिती मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला, पण पीडित महिला आढळून आली नाही. अखेर पोलिसांनी पीडितेच्या मोबाईल नंबरचं लोकेशन ट्रेस केलं. त्यात ही महिला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर आठ आणि नऊवर असल्याचं समोर आलं.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. प्लॅटफॉर्मवर पोलिसांनी या पीडितेची विचारपूस केली. ही तरुणी विवाहीत होती. पण पतीपासून वेगळी राहत होता. आपल्या पतीविरोधात ती कोर्टात गेली असून सध्या घटस्फोटासाठी या पीडितेची न्यायालयीन लढाई सुरु होती. ती मूळची फरीदाबादची होती. दोन वर्षांपूर्वी एका मुलांच्या संपर्कात ती आली होती. या मुलाच्या संपर्कातील एक रेल्वे कर्मचारी तिला नोकरी मिळवून देईल, अशी फूस तिला लावण्यात आली होती. त्यानंतर या दोघांमध्ये फोनवर बोलणं सुरु झालं.

21 जुलै रोजी रेल्वे कर्मचाऱ्यानं पीडितेला फोन करुन आपल्या जवळ बोलावून घेतलं होतं. मुलाचा वाढदिवस आहे, असं म्हणत पार्टीच्या उद्देशाने या तरुणीला आमंत्रण दिलं होतं. पीडित तरुणी किर्ती नगर इथं आली. मेट्रोने ती किर्ती नगर इथं पोहोचली होती. त्यानंतर आरोपी तिला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक आठ आणि नऊवर पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्यानं पीडितेला इलेक्ट्रीक मेन्टेनन्स कर्मचाऱ्यांसबोत एका छोट्या रुममध्ये बसण्यास सांगितलं. यानंतर थोड्यावेळाने आरोपी त्याच्या मित्रासह रुममध्ये आला आणि त्या दोघांनी मिळून बलात्कार केला. यावेळी आरोपीचे दोन मित्रा रुमबाहेर पहारा देत होते.

गुन्हा दाखल

अखेर या धक्कादायक घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जातोय. चौघा आरोपींनी सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी रेल्वे कर्मचारी आहे. दिल्लीच्या वसंत विहारमधील गँगरेपची घटना ताजी असतानाच आता नवी दिल्ली रेल्वे स्थानकातही सामूहिक बलात्काराच्या घटनेनं हादरुन गेलंय.

आरोपींची नावं

  • सतीश कुमार, वय 35, राहणार यूपी
  • विनोद कुमार, वय 38, राहणार नवी दिल्ली
  • मंगल चंद मीणा, वय 33, राहणार राजस्थान
  • जगदीश चंद, वय 37, राहणार दिल्ली
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.