Pune crime |विधीसंर्घषित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावली
समाजामध्ये या मुलांबाबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मुले व त्यांच्या पालकांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. कोरोनाच्या महामारीमुळे मागील दीडवर्षात या उपक्रमाला स्थगिती मिळाली होती. मात्र आता कोरोनाची स्थितीबरीच आटोक्यात असल्याने पुन्हा या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे
पुणे- शहरातील बालगुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच अल्पवयीन मुलांवर बसलेला गुन्हागारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी ‘होप फाॅर द चिल्ड्रेन फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था पुढे सरसावली आहे. विधीसंर्घषित, पीडित मुलांचे समुपदेशन करण्यासाठी, तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरात बालस्नेही पोलीस कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाद्वारे विधीसंर्घषित बालकांसाठी कायम समुपदेशनाचे आयोज केले जाते.
संवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न
समाजामध्ये या मुलांबाबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मुले व त्यांच्या पालकांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. कोरोनाच्या महामारीमुळे मागील दीडवर्षात या उपक्रमाला स्थगिती मिळाली होती. मात्र आता कोरोनाची स्थितीबरीच आटोक्यात असल्याने पुन्हा या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांनी दिली आहे.
या गोष्टींचे दिले जाते प्रशिक्षण
या उपक्रमाद्वारे मुलाची आवड लक्षात घेऊन त्याना ट्रेनिंग दिले जाते. यामध्ये मोबाईल दुरुस्ती, जीम टेनर असे काही कोर्सेस त्यांना संस्थेमार्फत शिकविले जातात.तसेच त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. एखाद्याला शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला शिक्षणासाठीही मदत केली जाते .याबरोबरच वेळोवेळी बालमानसोपचारतज्ञाचे मार्गदर्शनही घेतले जाते.
गुन्हेगारी कृत्यापासून अल्पवयीन मुलांना रोखण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तसेच गुन्हेगारीत ओढल्या गेलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुणे पोलीस कार्यरत असल्याचे पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
बारामतीतील अभिषेक ननवरे वयाच्या 18व्या वर्षी ठरला ‘आयर्नमॅन’
बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून, विषप्राशन केलेल्या पुण्यातील पतीचाही अखेरचा श्वास
भाजपच्या रक्तातच मुस्लीम बांधवांविषयी विष, जनतेनं त्यांना जाब विचारावा: दत्तात्रय भरणे