NIA Raid: अमरावती, भिवंडीत एनआयएचा छापा, पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या तरुण ताब्यात

NIA Raid in Maharashtra: एनआयएने राज्यातील भिवंडी आणि अमरावती या दोन शहरांत छापा टाकून एका, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. अमरावतीमधून ताब्यात घेतलेला तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होता. त्याची कसून चौकशी सुरु केली आहे.

NIA Raid: अमरावती, भिवंडीत एनआयएचा छापा, पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या तरुण ताब्यात
NIA
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 12:58 PM

NIA Raid In Amravati and Bhiwandi: महाराष्ट्रातील भिवंडी आणि अमरावती शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापा टाकला आहे. एनआयएने या दोन्ही शहरांत छापा टाकून एका, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.  भिवंडी आणि अमरावतीमधून ताब्यात घेतलेले तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होते. त्या दोघांची कसून चौकशी सुरु केली आहे. तसेच भिवंडीतील खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात एनआयएकडून ही कारवाई झाली. भिवंडीत वर्षभरात झालेली ही तिसरी कारवाई आहे.

अमरावतीचा तरुण पाकिस्तानमधील संघटनेचा संपर्कात?

अमरावतीच्या छाया नगरात एनआयएची टीम बुधवारी रात्री पोहचली होती. एनआयएच्या टीमने एका 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर त्या तरुणाला घेऊन एनआयएची टीम पोलीस ठाण्यात आली. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या युवकाची सध्या चौकशी सुरू आहे. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे. या तरुणासंदर्भात अधिक माहिती मिळाली नाहीत.

एनआयएला अमरावतीमधील एक तरुण पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एनआयएचे पथकाने बुधवारी थेट अमरावती पोहचले. त्या तरुणाला रात्री १२ वाजता ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरु केली. तो तरुण पाकिस्तानी संघटनेच्या कसा संपर्कात आला? अमरावती किंवा भारतात त्यांच्यासोबत कोण आहे? तो कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला का? या बाबत चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडून करण्यात येत आहे.

भिवंडीतून एकाला घेतले ताब्यात

अमरावतीप्रमाणे एनआयएची टीम भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पोहचली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने एकास ताब्यात घेतले आहे. कामरान अन्सारी 45 असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पाकिस्तानमधील एका संघटनेशी संपर्कात असल्याचा संशय आहे. भिवंडीत वर्षभरात एनआयएने केलेली ही तिसरी कारवाई आहे. यासंदर्भातील अधिक माहिती स्थानिक पोलिसांकडे नाही.

भिवंडीत यापूर्वी एनआयएने छापे टाकले होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने मोठी कारवाई केली होती. या ठिकाणावर 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती.

7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.