अबब! 100 किलो सोन्याची तस्करी; सांगलीत NIA कडून छापेमारी

दुबईतून केरळमध्ये तस्करीने आणलेले 100 किलो सोने तस्करीनेच सांगली जिल्ह्यात आणल्याची बाब उघडकीस आल्यानंतर एनआयएने तस्करीतील मुख्य सूत्रधाराला अटक केली. | Gold smuggling

अबब! 100 किलो सोन्याची तस्करी; सांगलीत NIA कडून छापेमारी
सोने तस्करी
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 10:16 AM

सांगली: सोन्याची मोठ्याप्रमाणावर तस्करी करण्यात आल्यामुळे सांगली जिल्हा आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) रडारवर आला आहे. केरळमधील 100 किलो सोने तस्करी (Gold) प्रकरणी एनआयएचे पथक तपासासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झालं आहे. दुबईतून केरळमध्ये तस्करीने आणलेले 100 किलो सोने तस्करीनेच सांगली जिल्ह्यात आणल्याची बाब उघडकीस आल्यानंतर एनआयएने तस्करीतील मुख्य सूत्रधाराला अटक केली. (NIA teams raids in Sangli district regarding Gold smuggling)

या अटकेनंतर एनआयएच्या एका पथकाकडून जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात छापे टाकण्यात आले. एनआयएच्या जिल्ह्यातील कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. जुलै 2020 मध्ये एनआयएने केरळमधून सांगलीत तब्बल 100 किलो सोने तस्करी केल्याप्रकरणी काही संशयितांना कस्टम विभागाने अटक केली होती. आता पुढील तपासात आणखी कोणत्या गोष्टी समोर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

14 किलो सोनं आणि 56 लाखांच्या कॅशसह 6 अट्टल चोरांना बेड्या!

नोएडा पोलिसांनी चोरांच्या टोळीतल्या 6 अट्टल चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेल्या साडे सहा लाख रुपयांचे सोने, आणि 57 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

नोएडा सेक्टर 39 पोलिसांना सदरपूर सोम बाजार जवळ काही संशयित उभे असल्याची खबर मिळाली होती. त्यांच्याकडे कोट्यावधींचे सोने आहे, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून राजन भाटी व अरुण यांच्याजवळून 1-1 किलो सोन्याचे बिस्किटे आणि रोकड जप्त केली. चौकशीदरम्यान त्यांनी आणखी सहा साथीदारांची नावे सांगितली.

या सर्व टोळीतील चोरट्यांकडून पोलिसांनी 13.9 किलो सोने, 1 कोटी 10 लाख रुपयांचे जमिनीची कागदपत्रे, तसंच 57 लाखांची रोकड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत बाजारात 6.55 कोटी रुपये सांगितली जात आहे. आरोपींकडून पोलिसांनी जवळपास सुमारे 8.25 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ही संपत्ती देखील बदमाशांनी चोरीच्या पैशांनी खरेदी केली होती.

इतर बातम्या:

तीन महिन्यात 2 कोटी, दोन दिवसात 25 लाखांची दारू पकडली, जलमार्गाने दारूची तस्करी करणाऱ्यांची आता खैर नाही

गोदावरी नदीपात्रात फटफटी गँगचा धुमाकूळ, वाळू उपशामुळे मोक्षघाटास नुकसान होण्याची शक्यता

चोराच्या घरातूनच करोडो रुपयांची चोरी, 14 किलो सोनं आणि 56 लाखांच्या कॅशसह 6 अट्टल चोरांना बेड्या!

(NIA teams raids in Sangli district regarding Gold smuggling)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.