संतापजनक ! औषधं किंवा ऑक्सिजन बेडसाठी सोशल मीडियावर मदत मागणाऱ्या महिलांना अश्लील मेसेज
सोशल मीडियावर औषध किंवा ऑक्सिजनची मदत मागणाऱ्या महिलांच्या मोबाईल नंबरवर काही विकृत लोक अश्लील मेसेज पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Obscene messages to women seeking help on social media for medicines or oxygen beds).
नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाचं थैमान सुरु आहे. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था पुढे येऊन आपलं योगदान देत आहेत. सोशल मीडियावर अनेक महिला सामाजिक कार्यकर्त्याही मदतीसाठी पुढे आल्या आहेत. रुग्णांना औषधं, ऑक्सिजन बेड मिळावे यासाठी मदत करत आहेत. सर्वसामान्यांना मदत मिळावी यासाठी अनेक महिलांनी आपला फोन नंबर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दुसरीकडे काही महिला आपल्या कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीसाठी औषध किंवा ऑक्सिजनची मदत मागण्यासाठी सोशल मीडियावर आपला मोबाईल नंबर शेअर करत आहेत. मात्र, महिलांच्या मोबाईल नंबरवर काही विकृत लोक अश्लील मेसेज पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Obscene messages to women seeking help on social media for medicines or oxygen beds).
विकृतांवर अनेकांकडून संताप व्यक्त
कोरोना महामारीत सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या महिला कार्यकर्त्या किंवा मदतची विनंती करणाऱ्या महिलांना अशाप्रकारे अश्लील मेसेज पाठवणं हे नींदनीय आहे. अशा विकृत लोकांवर कारवाई होणं जरुरीचं आहे. तरंच अशा लोकांना धडा मिळेल, अशी प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटत आहे (Obscene messages to women seeking help on social media for medicines or oxygen beds).
दिल्ली महिला आयोगाचं महिलांना तक्रार करण्याचं आवाहन
दरम्यान, विकृत लोकांच्या अशा प्रकारच्या कृत्याची माहिती दिल्ली महिला आयोगापर्यंतही पोहोचली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी इतर महिलांना अशा लोकांची माहिती महिला आयोगाला देण्याचं आवाहन केलं आहे.
स्वाती मालीवाल यांचं ट्विट
दिल्लीसह संपूर्ण देश आज कोरोनाविरोधात लढत आहे. मात्र, या संकट काळातही काही विकृत लोक संधी सोडत नाहीयत. ट्विटरवर औषधं किंवा ऑक्सिजन बेड्सची विनंती करणाऱ्या महिलांच्या मोबाईल नंबरवर काही विकृत लोक फोन करत आहेत. तसेच त्यांना फोनही करत आहेत. अशा लोकांविरोधात दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार कराल, असं आवाहन स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवर केलं आहे. त्यांनी महिलांना livingpositive@gmail.com या मेल आयडीवर तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.
(2/2) यदि आपके या आपके किसी जानने वाले के साथ भी इस तरह की कोई बदतमीजी हुई है तो दिल्ली महिला आयोग को livingpositive@gmail.com पर ईमेल कर शिकायत करें. ऐसे लफंगों को छोड़ा नहीं जाएगा
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) May 19, 2021
हेही वाचा : एकमेकांवर प्रेम जडलं, आयुष्यभर सोबतीचा निश्चय, कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचा टोकाचं पाऊल