अरे बापरे, अचानक रेल्वे स्टेशनच्या टीव्ही स्क्रीनवर सुरु झाली पॉर्न क्लिप
भारतातल्या 'या' रेल्वे स्टेशनवर घडला धक्कादायक प्रकार. भारतातल्या काही भागांमध्ये जाहीरात सुरु way : असताना अचानक पॉर्न क्लिप चालू झाल्याचे प्रकार याआधी घडले आहेत.
पाटना : मोठ्या स्क्रीनवर जाहीरातीच्या जागी अचानक पॉर्न क्लिप सुरु झाल्याचे प्रकार काही भागात घडले आहेत. सार्वजनिक, वर्दळीच्या ठिकाणी टीव्हीची मोठी स्क्रीन लावली जातो. जाहीरातींसाठी लोकांच लक्ष वेधून घेणं, हा त्यामागे उद्देश असतो. भारतातल्या काही भागांमध्ये जाहीरात सुरु असताना अचानक पॉर्न क्लिप चालू झाल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. असाच प्रकार बिहारच्या पाटना रेल्वे स्टेशनवर रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडला.
पाटना रेल्वे स्टेशनवर टीव्हीची मोठी स्क्रीन लावली आहे. तिथे जाहीरातीच्या जागी अचानक पॉर्न क्लिप सुरु झाली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांना मोठा धक्का बसला.
प्रवाशांनी काय केलं?
प्रवाशांनी लगेच या प्रकाराची रेल्वे पोलिसांकडे (GRP) तक्रार केली. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडे (RPF) सुद्धा तक्रार दिली. प्रवाशांनी जराही वेळ वाया घालवला नाही.
टीव्ही स्क्रीनची जबाबदारी कोणाकडे?
जवळपास 3 मिनिट मोठ्या टीव्ही स्क्रीनवर ही पॉर्न क्लिप सुरु होती. रेल्वे पोलिसांनी Action घ्यायला वेळ लावला. त्यानंतर RPF ने दत्ता कम्युनिकेशनशी संपर्क साधला. या एजन्सीकडे स्क्रीनवर जाहीराती दाखवण्याची जबाबदारी आहे. त्यांनी एजन्सीच्या ऑपरेटर्सना पॉर्न क्लीप बंद करण्याची सूचना केली. यावेळी रेल्वे स्टेशनवर महिला आणि मुलं देखील होती.
रेल्वेने काय कारवाई केली?
रेल्वे अधिकाऱ्यांनी नंतर कारवाई केली. त्यांनी दत्ता कम्युनिकेशन विरोधात FIR नोंदवला. रेल्वेने या एजन्सीला ब्लॅकलिस्ट केलं व त्यांच्यावर दंड आकारला. किती नंबर प्लॅटफॉर्मवर हा प्रकार घडला?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी एजन्सी बरोबरच कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं. रेल्वे स्टेशनवरील टेलिव्हिजन स्क्रीनवर जाहीराती दाखवण्याची जबाबदारी या एजन्सीवर होती. रेल्वे विभाग या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करतोय. प्लॅटफॉर्म नंबर 10 वर हा व्हिडिओ प्रसारीत झाला. या संदर्भात काही जणांची चौकशी झाली आहे.