Thane : कोकेन विकायला आलेल्या आरोपी ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले, 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोफी चार्ल्स उर्फ किंग असे या अटक करण्यात आलेल्या परदेशी आरोपीचे नाव असून रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्ट, आफ्रिकेचा रहिवाशी आहे. तो मुंबईत सध्या साकीनाका मेट्रो, मुंबई येथे स्थायिक होता.

Thane : कोकेन विकायला आलेल्या आरोपी ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले, 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोकीन विकायला आलेल्या आरोपी ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले, 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 1:57 PM

ठाणे – ठाण्यातील (Thane) वागळे इस्टेट (wagle estate) परिसरातील ज्ञानेश्वर नगर परिसरात एक व्यक्ती कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे घटक 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार घटक 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले. या पथकाने संबंधित मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून एका परदेशी व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता या पथकाला 60 ग्राम वजनाचे कोकिन हे आमली पदार्थ आढळून आले. मिळालेल्या मुद्देमालानंतर पोलिसांनी (Police) त्याच्या विरोधात भादवी कलम ८(क), २०(क), २९ एन.डी.पी.एस. अधिनियमान्वाये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला.

नेमकं काय घडलं

कोफी चार्ल्स उर्फ किंग असे या अटक करण्यात आलेल्या परदेशी आरोपीचे नाव असून रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्ट, आफ्रिकेचा रहिवाशी आहे. तो मुंबईत सध्या साकीनाका मेट्रो, मुंबई येथे स्थायिक होता. त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले कोकिन हे त्याने आपल्या आफ्रिकन साठीदाराकडून घेऊन ठाणे येथे विक्री करण्यासाठी आणले होते. त्याच्याकडून पोलिसांनी आत्तापर्यंत 60 ग्राम वजनी कोकीन हा अमली पदार्थ, एक मोबाईल, रिपब्लिक ऑफ आयवोरी कोस्ट या देशाचे पासपोर्ट आणि विजा असा एकूण 24 लाख 6 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कोकिन अमली पदार्थ विक्री करणारे हे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा परदेशी व्यक्ती हे कोकिन कुठून, कसे, आणि कोणाच्या मदतीने विक्री साठी आणत होता याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच त्याच्या आफ्रिकन साथीदारांचा शोध देखील पोलीस घेत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे घटक 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे करत आहेत.

हे सुद्धा वाचा

मोठ रॅकेट उघड होण्याची शक्यता

मुंबईत आत्तापर्यंत अनेकांना अटक केली आहे. तरीही अशी प्रकरण वारंवार उघडकीस येत आहेत. सध्या ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील एक मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.