पोलिसांच्या भीतीने नदीत उडी टाकल्याने बुडून एकाचा मृत्यू; संतप्त जमावाचा पोलिसांवरही झाला हल्ला
अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच मंगलेश भोसले याने भितीपोटी पळ काढला. लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारत पलीकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. परंतू पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.
बारामती: बारामतीतील सोनगाव येथे पोलीस पथक अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करताना धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस कारवाईसाठी गेले असताना भितीपोटी एकाने पळ काढत निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली. यावेळी दम लागल्याने बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मंगलेश अशोक भोसले (वय ४५, रा. सोनगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर संतप्त झालेल्या संबंधित वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अशी घडली घटना घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच मंगलेश भोसले याने भितीपोटी पळ काढला. लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारत पलीकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. परंतू पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.
नागरिकांचा पोलिसांवर हल्ला संतप्त जमावा
मंगलेश भोसलेचा मृत्यू झाल्यामुळं संतप्त झालेल्या वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे सोनगावातील स्थिती अधिकच चिघळली आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवत घटनास्थळी ती पाठवली आहे. सद्यस्थितीला गावात तणावाचे वातावरण आहे.
अजित पवारांनी दिले होते आदेश
बारामतीच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या अवैध दारु धंद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला खडसावले होते. तसेच कारवाई करत हे सगळे अवैध दारु धंदे बंद करण्यास सांगितले होते.
प्रसिद्धीसाठी आंदोलनता उतरलात तर संघटनेचा फायदा होत नाही- रोहित पवार
Aurangabad: वाळूज परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन घरे फोडली
रुग्णालयात रुग्णांसोबत गैरवर्तन केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; महापौर उषा ढोरे भडकल्या