AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या आडोश्याला मित्रासोबत पार्टी करत होते, अचानक तिघा चोरट्यांनी बंदुक रोखली मग…

शिवाजी होले हे आपला मित्र अरुण शिंदे याच्यासोबत नगर पुणे रोडवरील केडगाव बायपास रोडवर हॉटेल के नाईन जवळ रात्री उशिरा आडोश्याला दारू पित होते. यावेळी अचानक तोंडाला रुमाल बांधलेले तीन अज्ञात लोक आले.

हॉटेलच्या आडोश्याला मित्रासोबत पार्टी करत होते, अचानक तिघा चोरट्यांनी बंदुक रोखली मग...
अहमदनगरमध्ये चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 10:48 AM

अहमदनगर / कुणाल जयकर : मित्रासोबत दारु पित उभ्या असलेल्या इसमाचा अज्ञात चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर शहरातील केडगाव बायपास रोडवर घडली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. चोरीच्या उद्देशाने गोळीबार करत तीन हजार रुपयांसह मोबाईल चोरी केला. शिवाजी होले असे गोळीबारात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मित्रासोबत दारु पित उभे होते

शिवाजी होले हे आपला मित्र अरुण शिंदे याच्यासोबत नगर पुणे रोडवरील केडगाव बायपास रोडवर हॉटेल के नाईन जवळ रात्री उशिरा आडोश्याला दारू पित होते. यावेळी अचानक तोंडाला रुमाल बांधलेले तीन अज्ञात लोक आले. तिघे जण चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून पैशांची मागणी करू लागले. मात्र शिवाजी होले यांनी या तिघांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

झटापटीत चोरट्यांनी गोळी झाडली

या झटपटीत शिवाजी होले यांच्यावर तिघांपैकी एकाने बंदुकीतून गोळीबार केल्याने शिवाजी होले जागेवरच गतप्राण झाले. यावेळी अरुण शिंदे यांनी तिथून पळ काढून पोलिसांची संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरटे फरार झाले होते.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी विविध पथके तयार करून तपास सुरू केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.