Indore Death : डिजेच्या तालावर सुरु होती कावड यात्रा, विजेच्या तारेला स्पर्श झाला; शॉक लागून एक ठार तर तीन जखमी

डीजे लावलेल्या वाहनावर चढून तालावर नाचणार्‍या यात्रेकरुंच्या हाताला 11 हजार किलोवॅटच्या विजेच्या तारेने स्पर्श केल्याने वाहनात करंट पसरला.

Indore Death : डिजेच्या तालावर सुरु होती कावड यात्रा, विजेच्या तारेला स्पर्श झाला; शॉक लागून एक ठार तर तीन जखमी
डिजेच्या तालावर सुरु होती कावड यात्रा, वीजेच्या तारेला स्पर्श झालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 8:54 PM

इंदूर : कावड यात्रेदरम्यान डिजेच्या तालावर नाचताना वीजेचा शॉक (Electric Shock) लागून एका यात्रेकरुचा मृत्यू (Death) तर तीन जण जखमी (Injured) झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी इंदूर जिल्ह्यातील महू येथे घडली. डीजे लावलेल्या वाहनावर चढून तालावर नाचणार्‍या यात्रेकरुंच्या हाताला 11 हजार किलोवॅटच्या विजेच्या तारेने स्पर्श केल्याने वाहनात करंट पसरला. वीजेचा झटका लागल्याने काही तरुण वाहनाच्या छतावर पडले. सिमरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रौनक असे मयत तरुणाचे नाव आहे. तर शिव, लोकेश आणि अतुल अशी जखमी तरुणांची नावे आहेत. शिवला उपचारासाठी एमवाय रुग्णालयात तर लोकेश आणि अतुलला महू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे इंदूर ग्रामीणचे एसपी भगवत सिंह विर्दे यांनी सांगितले.

ओंकारेश्वरहून पाणी घेऊन परत येत होते

सिमरोलच्या मेमडी गावात अपघात होण्यापूर्वी रविवारी रात्री सर्व कावड यात्री एक दिवस आधी तलावाजवळ विश्रांतीसाठी थांबले होते. ही कावड यात्रा ओंकारेश्वर ते सिमरोल परिसरातील बगोडा या गावाकडे जल घेऊन निघाली होती. कावड यात्रेचे हे चौथे वर्ष होते. कावड यात्रेकरुंकडून शुल्क आकारले जाते.

पश्चिम बंगालमध्येही अशीच एक घटना घडली

पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये सोमवारी पिकअपला विजेचा धक्का लागून 10 कावड यात्रेकरुंचा मृत्यू झाला, तर 16 जण गंभीररीत्या भाजले. मेखलीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील धरला पुलावर हा अपघात झाला. पिकअपवर बसलेल्या जलपेशच्या शिवमंदिरात 27 यात्रेकरु जल अर्पण करण्यासाठी जात होते. पिकअपच्या मागे डीजे वाजत होता. जनरेटरच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने करंट पिकअपपर्यंत पोहोचला आणि यात्रेकरुन याच्या कचाट्यात आले. (One pilgrim dies, three injured after being electrocuted while dancing to DJ tunes in Indore)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.