पहिल्या नजरेतच तो बिजनेस वुमनच्या नजरेत भरला, त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर लावला आणि मग, एकदिवस…
Love Affair | चैतन्याला प्रणव समजून भोगिरेड्डी तृष्णा त्याच्यावर प्रेम करु लागली. नंतर तिला समजलं की, चैतन्याने प्रणवचा प्रोफाइल फोटो लावलाय. मग तृष्णाने प्रणवला भेटून सर्व सत्य सांगितलं.
नवी दिल्ली : प्रेम एकतर्फी असेल, त्यात समजूतदारपणा नसेल, तर मोठ्या समस्या निर्माण होतात. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलय. काहीवेळा एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारी कृत्य करण्यापर्यंत मजल जाते. तो किंवा ती माझीच झाली पाहिजे, ही भावना मनात इतकी घर करते की, माणसू त्यासाठी टोकाच पाऊल उचलायलाही मागेपुढे पाहत नाही. हैदराबादच्या उप्पल पोलीस ठाण्यात एक वेगळच प्रकरण समोर आलय. य़ात महिलेने टीव्ही अँकर प्रणव सिस्ताला किडनॅप केलं. उप्पल पोलिसांनी टीव्ही चॅनलचा अँकर प्रणव सिस्ताच्या किडनॅपिंगच्या आरोपावरुन भोगिरेड्डी तृष्णा नावाच्या महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोगिरेड्डी तृष्णा एक यंग बिजनेस वुमन आहे. ती एक डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवते. दोन वर्षांपूर्वी भारत मॅट्रिमोनीवरुन तिची चैतन्या नावाच्या एका युवकाबरोबर ओळख झाली. हा चैतन्या अँकर प्रणवचा फोटो वापरत होता. चैतन्याला प्रणव समजून भोगिरेड्डी तृष्णा त्याच्यावर प्रेम करु लागली. नंतर तिला समजलं की, चैतन्याने प्रणवचा प्रोफाइल फोटो लावलाय. मग तृष्णाने प्रणवला भेटून सर्व सत्य सांगितलं.
त्या महिलेचा व्यवसाय काय?
दोघांनी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राइम विभागात तक्रार केली. पोलिसांनुसार प्रणव पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आवड म्हणून तो म्यूजिक चॅनलमध्ये अँकरिंग करतो. डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवणाऱ्या तृष्णाला ऑनलाइन मॅट्रिमोनी पोर्टलवर प्रणवचा प्रोफाइल फोटो आवडला. चैतन्या ऐवजी तिला प्रणवच्या जवळ जायच होतं. तिने ठरवलं की, लग्न करीन तर प्रणवशीच.
प्रणव कुठेही जायचा, ते तिला समजायच
तृष्णाने प्रणवच्या कारमध्ये ‘ऐप्पल एयर टॅग’ (जीपीएस ट्रैकर) लावला, ज्यामुळे तिला प्रणवच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवता येत होतं. प्रणव कुठेही जायचा, ते तिला समजायच. त्याला प्रेमात पाडण्यासाठी सतत त्याच्याशी फोनवरुन बोलायची. पण प्रणवच्या मनात असं काही नव्हतं. आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून तो तृष्णाचा विचार करत नव्हता.
संपूर्ण रात्र त्याला एका खोलीत ठेवलं
फेब्रुवारी महिन्याच्या 10 तारखेला मध्यरात्री तृष्णाने चार लोकांच्या साथीने प्रणवची गाडी अडवली. त्याला किडनॅप केलं. प्रणवला किडनॅप केल्यानंतर तृष्णाने संपूर्ण रात्र त्याला एका खोलीत ठेवलं. त्याला भरपूर मारहाण केली. लग्न करण्यासाठी त्याला भाग पाडण्याचा प्लान होता. पण 11 फेब्रुवारीला प्रणव कसाबसा तृष्णाच्या तावडीतून निसटला.
प्रणवने आधी पोलीस ठाण गाठलं
त्यानंतर पीडित प्रणवने उप्पल पोलिसांशी संपर्क साधला व आपल्यासोबत काय घडलं? ते सर्व सांगितंल. तृष्णा विरुद्ध तक्रार नोंदवली. प्रणवच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी तृष्णाला अटक केली. तिला रिमांडवर पाठवण्यात आलय. पोलीस अन्य चार आरोपींचा शोध घेत आहेत.