अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत बलात्कार, पाकिस्तानात माणुसकीला लाजवणारी घटना

सराईत गुंडाने रात्री अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढला. त्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाझुडपात तिचे शव नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला.

अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत बलात्कार, पाकिस्तानात माणुसकीला लाजवणारी घटना
पाकिस्तानात मुलीच्या मृतदेहावर बलात्कार
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 10:45 AM

इस्लामाबाद : पाकिस्तानात हैवानालाही लाजवणारी घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत तिच्यावर बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. 13 ऑगस्टला पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असताना आरोपीने हे घृणास्पद कृत्य केलं. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यातील असरफ चांडीओ गावात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.

काय आहे प्रकरण?

असरफ चांडीओ गावात राहणाऱ्या 14 वर्षांच्या मुलीचा 12 ऑगस्टला तापाने फणफणून मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी तिच्या मृतदेहाचे गुलामुल्लाह कबरस्तानामध्ये विधिवत दफन करण्यात आले होते. मात्र त्या भागातील एका गुंडाने त्याच रात्री तिचा मृतदेह कबरस्तानातून बाहेर काढला. त्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाझुडपात तिचे शव नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा मृतदेह तिथे झाडीत टाकून तो पसार झाला. आरोपीचे नाव रफीक चांडीओ आहे.

दुसऱ्या दिवशी घटना उघड

तरुणीची कबर खणली असून आत मृतदेह नसल्याचं दुसऱ्या दिवशी काही जणांच्या ध्यानात आलं. याची माहिती तातडीने तिच्या वडिलांना देण्यात आले. तिचे वडील आणि गावकरी घटनास्थळी गेले. पोलिसांना बोलावून मृतदेह शोधण्यात आला. काही वेळातच जवळच्या झाडीत तरुणीचा मृतदेह सापडला. मृतदेहाला घातलेले कपडे अस्ताव्यस्त होते. पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटला पाठवला असता डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याच्या शंकेला अधिकृत दुजोरा दिला.

आरोपीचा खात्मा

या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिकांनी पोलिसांविरोधातही नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जी केल्याचा आरोप केला जात होता. आरोपी गुंड रफीक चांडीओ याला तुरुंगात टाकलं तर तो पैसे चारुन बाहेर येईल, त्यापेक्षा त्याला थेट गोळी घाला, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. पोलिसांनी तातडीची पावलं टाकत आरोपीची शोध मोहीम हाती घेतली.

छापेमारी करताना रफीकने पोलिसांवरही गोळी झाडली. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत पोलिसांनी त्याचा खात्मा केला. आरोपी गुंड रफीक चांडीओ हा सराईत गुन्हेगार होता, त्याने गेल्या दहा वर्षांपासून लूट, दरोडेखोरी असे गुन्हे केले होते, यावेळी त्याने माणसाच्या कल्पनेपलिकडचे कृत्य केले, तो मानवी शरीरातील हैवान होता, असं थट्टा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी डॉ. इमरान खान म्हणाले.

संबंधित बातम्या :

आई-काकाची हत्या करुन मुलगा दोन दिवस मृतदेहांजवळ बसून, दोनदा आत्महत्येचाही प्रयत्न

500 CCTV कॅमेरे, 800 तासांचे चित्रीकरण, 200 जणांची चौकशी, न घडलेल्या बलात्काराचं सत्य ‘असं’ समोर

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.