पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी महिलेचा भयानक कट, आधी खून करणाऱ्यासोबत लग्न, मग पिस्तूल खरेदी, नंतर…..

एखाद्या हिंदी चित्रपटाची थ्रिलर स्टोरी असावी अशी हुबेहुब घटना वास्तव्यात घडली आहे.

पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी महिलेचा भयानक कट, आधी खून करणाऱ्यासोबत लग्न, मग पिस्तूल खरेदी, नंतर.....
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 3:10 PM

इस्लामाबाद : एखाद्या हिंदी चित्रपटाची थ्रिलर स्टोरी असावी अशी हुबेहुब घटना वास्तव्यात घडली आहे. एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एक भयानक प्लॅन आखला. तिने तो प्लॅन फक्त आखला नाही तर त्यानुसार सर्व नियोजन करुन तो प्लॅन पूर्ण करुन आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेतला. तिने आपल्या पतीची हत्या करणाऱ्याला अखेर यमसदनी पाठवलं. संबंधित घटना ही पाकिस्तानच्या कबायली भागात घडली. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. विशेष म्हणजे महिलेने पतीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हल्लेखोराशी लग्न केलं. त्यानंतर त्याचा खून केला.

पतीचं तीन वर्षांपूर्वी निधन

पाकिस्तानच्या कबायली येथील बाजौर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आरोपी महिलेचा पतीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. पण त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की हत्या झाली हे स्पष्ट झालं नव्हतं. पतीच्या मृत्यूबाबत महिलेला शंका होती. त्यामुळे तिने आपल्या स्तरावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिच्या पतीची हत्या करण्यात आल्याची माहिती तिला मिळाली. विशेष म्हणजे तिच्या पतीचा जवळचा मित्र गुलिस्तान खान यानेच त्याला विषारी इंजेक्शन देऊन त्याची हत्या केल्याची माहिती तिला मिळाली.

महिलेने हत्येचा कट आखला

आपल्या पतीची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलेने त्याचदिवशी त्या हत्येचा बदला घ्यायचा, असं मनाशी ठाम केलं. त्यानंतर महिलेने चार-पाच महिन्यांमध्ये आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्याचा सर्वोतोपरी प्रयत्नही केला. मात्र, तिला त्यात अपयश आलं. अखेर तिने एक कट आखला. याद्वारे तिने गुलिस्तान खान सोबत लग्न करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याची हत्या करण्याचं निश्चित केलं.

महिलेकडून अखेर गुलिस्तानची हत्या

गुलिस्तान खान याचं आधीपासून लग्न झालेलं होतं. त्याला एक मुलगा देखील आहे. मात्र, महिलेने त्याला पैसे आणि संपत्तीचं लालच देऊन लग्नासाठी होकार देण्यास भाग पाडलं. अखेर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांनी महिलेने गुलिस्तानला स्वत:च्या संरक्षणासाठी घरात एक पिस्तूल हवी, असं सांगितलं. त्यानंतर गुलिस्तान याने पिस्तूल विकत घेतली. त्यानंतर आरोपी महिलेने मध्यरात्री संधी साधून गुलिस्तान याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

पोलिसांकडून महिलेला बेड्या

महिलेने गुलिस्तान याच्या हत्येनंतर पोलिसांना दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने आपल्या पतीची हत्या केली, असं सांगितलं. पण पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. यावेळी तिने पोलिसांना सविस्तर घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी तिला कर्टात हजर केलं. त्यानंतर तिला कोठडीत पाठवण्यात आलं.

महिलेने गुलिस्तानची हत्या कशी केली?

“मी रात्री उभिरापर्यंत जागी राहिली. गुलिस्तान झोपला होता. रात्री एक वाजता मी दुसऱ्या खोलीत गेली. तितून मी पिस्तूल घेतली आणि गुलिस्तान याच्यावर उगारली. पण पिस्तूलमधून गोळीच बाहेर पडली नाही. नंतर मी दुसऱ्या खोलीत गेली. तिथे मी पिस्तूल चेक केली. त्यानंतर पुन्हा गुलिस्तानच्या खोलीत आली. तिथे मी गुलिस्तानच्या डोक्यावर पिस्तूल ठेवली आणि गोळी झाडली. यावेळी त्याला गोळी लागली. तो तडफडू लागला. त्यानंतर आणखी एक गोळी मी त्याचा अंगावर झाडली. त्याचा जागेवर मृत्यू झाला. त्यानंतर मी रात्रभर तिथेच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी पहाटे मी लोकांना माझ्या पतीची कुणीतरी हत्या केली, असं सांगितलं”, अशी माहिती महिलेने पोलिसांना दिली.

हेही वाचा : आधी पतीने हॉटेलात विष पिऊन जीव दिला, दहाव्या दिवशी उच्चशिक्षित मायलेकीचीही आत्महत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.