Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: पालघरच्या डहाणूमध्ये हिट अँड रन, पोलिसाच्या गाडीनं दुचाकीस्वाराला उडवलं, तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार, गुन्हा दाखल

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये हिट अँड रनचं प्रकरण उघडीकस आलंय. विशेष बाब म्हणजे हे सहायक पोलीस निरीक्षकाच्या गाडीनं एका दुचाकीस्वाराला उडवण्यात आलंय.

Video: पालघरच्या डहाणूमध्ये हिट अँड रन, पोलिसाच्या गाडीनं दुचाकीस्वाराला उडवलं, तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार, गुन्हा दाखल
पोलिसाच्या कारचा थरार
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 11:42 AM

पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये हिट अँड रनचं प्रकरण उघडीकस आलंय. विशेष बाब म्हणजे हे सहायक पोलीस निरीक्षकाच्या गाडीनं एका दुचाकीस्वाराला उडवण्यात आलंय. याशिवाय तीन चाकावर गाडी चालवल्याचा थरार देखील घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितंल आहे. पोलिसाच्या गाडीनं दुाचाकीस्वाराला उडवलं असून तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार डहाणूमध्ये पाहायला मिळालं. या घटनेप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आलाय.

नेमकं काय घडलंय?

डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तारापूर ते डहाणू पोलीस ठाण्यापर्यंत भरधाव गाडी चालवून अपघात करून काहींना जखमी केल्याची घटना समोर आलीय. त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

18 किलोमीटरपर्यंत तीन चांकांवर भरधाव वेगात चालवली कार

पोलीस निरीक्षकाच्या गाडीनं एका बाईक स्वाराला जोरदार धडक दिली. यानंतर चक्क तीन चाकांवर कार जवळपास 18 किलोमीटर पर्यंत भरधाव चालवण्यात आली. डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात पार्क करून कार चालक भिंतीवरून उडी मारून पळून गेल्याचे सांगितले जातंय. मात्र, ही कार डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे.

कार नेमकी कोणं चालवत होतं?

डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात पार्क करण्यात आलेल्या कार मध्ये पोलीस हॅट कॅप सुद्धा आढळून आली आहे. ही अपघाताची घटना वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर, सुहास खरमाटे हे अजूनही फरार असल्याचे बोलले जातेय. मात्र, गाडी नेमकी कोण चालवत होतं हे अद्याप समोर आलेलं नाही. विशेष म्हणजे या गाडीमध्ये पोलिसांची टोपी असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या:

चंद्रपूरमध्ये बर्निंग कारचा थरार, काही मिनिंटामध्ये होत्याचं नव्हतं, पाहा व्हिडीओ

नागपूरमध्ये मध्यरात्री गुंडाच्या हत्येचा थरार, घराबाहेर बसल्याच्या कारणावरुन वादाचा भडका, नेमकं काय घडलं?

Palghar Dahanu case register on Assistant Police Inspector due dangerous driving and responsible for accident