Palghar Sadhu Murder : पालघर साधू सामुहिक हत्याकांड प्रकरणातील 10 आरोपींना सशर्त जामीन

पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे हत्या दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.

Palghar Sadhu Murder : पालघर साधू सामुहिक हत्याकांड प्रकरणातील 10 आरोपींना सशर्त जामीन
पालघर साधू हत्याकांडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 11:53 PM

मुंबई : पालघर साधू सामुहिक हत्याकांड (Palghar Sadhu massacre) प्रकरणातील 10 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं(Mumbai High Court)  त्यांना जामीन मंजूर केलाय. या आरोपींची ओळख न पटल्यानं, पुराव्याअभावी 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर 10 आरोपींना सशर्त जामीन (Conditional bail) मंजूर करण्यात आला आहे. तर 8 आरोपींचा हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असल्याचं पुराव्यासह निष्पन्न होत असल्याचं सांगत त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे हत्या दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.

साधू हत्याकांडातील 10 आरोपींना जामीन

नेमकं प्रकरण काय?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत 101 जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

पोलिसांवरही कारवाई

साधू हत्याकांड प्रकरणात राज्य सरकारकडून पोलिसांवरही कारवाई करण्यात आली होती. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार 15 पोलिसांच्या पगारामध्ये कपात करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, तर दोन जणांना सेवा निवृत्तीवर पाठवले आहे.

इतर बातम्या : 

’10 ते 15 महिन्यात गोव्यात आमचं सरकार’, काँग्रेस आमदार मायकल लोबो यांचा दावा!

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची महागाईची गुढी, बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.