परमबीरांच्या बेनामी मालमत्तेच्या सुरस कथा; पुनमियाच्या बनावट उताऱ्याला सरकारी कचेरीतून फुटले पाय, संशयाचे धुके गडद

फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाच्या बेनामी मालमत्तेच्या एकेक सुरस कथा बाहेर येत असताना त्याला आता एक अपेक्षेप्रमाणे तडका मिळाला आहे.

परमबीरांच्या बेनामी मालमत्तेच्या सुरस कथा; पुनमियाच्या बनावट उताऱ्याला सरकारी कचेरीतून फुटले पाय, संशयाचे धुके गडद
परमबीर सिंह.
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 10:50 AM

नाशिकः  फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाच्या बेनामी मालमत्तेच्या एकेक सुरस कथा बाहेर येत असताना त्याला आता एक अपेक्षेप्रमाणे तडका मिळाला आहे. पुनमियाने सिन्नरमध्ये जमीन खरेदीसाठी वापरलेला बनावट सातबारा उताराच आता सरकारी कचेरीतून गायब झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पाणी किती खोलवर मुरले आहे, ते समोर येत आहे.

मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’ असून, त्यांनी ही मालमत्ता संजय पुनमियाच्या नावे खरेदी केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय पुनमियाविरोधात अग्रवाल नावाच्या व्यक्तीने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय पुनमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. तो मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. पुनमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. ही जमीन पुनमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पुनमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे. मात्र, आता या जमीन खरेदीसाठी वापरलेला बनावट सातबारा रातोरात सरकारी कचेरीतून गायब करण्यात आला आहे. दैनिक दिव्य मराठीने आज बुधवारी तसे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पुनमियाने 2007 मध्ये धारणगाव येथे जमीन खरेदी केली होती. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील उत्तन गावातील उतारे खरेदीसोबत जोडले होते. या उताऱ्यावर मूळ मालक म्हणून कयोमर्झ कावस पालिया यांचे नाव आहे. ते नाव खोडून त्यावर पुनमियाचे नाव टाकल्याचा संशय आहे. हा बनावट उताराच सरकारी कचेरीतून गायब झाल्याने संशयाचे धुके गडद झाले आहे.

पुनमिया भाजप आमदाराचा नातेवाईक

पुनमिया हा भाजप आमदार गीता जैन यांचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे. त्याने राजकीय दबावतंत्राचा वापर करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता एकीकडे परमबीर सिंहाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांनी स्वतःच देश सोडून पलायन केल्याची जोरदार चर्चा आहे. नेमकी अशा वेळी पुनमियाविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे पुनमियाचे राजकीय दबावतंत्र आणि परमबीर सिंहाचा वरदहस्त सध्या कामी येत नाही. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

इतर बातम्याः

मालमत्तेचा मालकी हक्क निश्चिती अन् चौकशीचे काम सुरू; नाशिक महापालिकेचा पुढाकार

उत्तर महाराष्ट्राला कोरोनाचा दिलासा; विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्क्यांवर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.