परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरणः पुनमियाला जिल्हा व सत्र न्यायालयाचा तूर्तास दिलासा, सुनावणी चार आठवडे पुढे

फरार असणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणात कळीची भूमिका बजावणाऱ्या संजय पुनमिया याला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने तूर्तास दिलासा देत सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली आहे.

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरणः पुनमियाला जिल्हा व सत्र न्यायालयाचा तूर्तास दिलासा, सुनावणी चार आठवडे पुढे
District and Sessions Court of Nashik.
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 1:00 PM

नाशिकः फरार असणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणात कळीची भूमिका बजावणाऱ्या संजय पुनमिया याला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने तूर्तास दिलासा देत सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुनमियाची पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयाकडे विनंती केली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने ती मान्य केली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधत कोठडी देण्याची विनंती केली होती. पुनमिया सध्या दुसऱ्या एका प्रकरणात मुंबईत पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. ही कोठडी संपताच त्याला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू आहे. हे पाहता पुनमियाने जामिनासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी त्याला न्यायालयाने तूर्तास दिलासा देत सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली आहे. मात्र, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात त्याने दाखल केलेल्या अर्जावर मुंबईत दाखल गुन्हातील तक्रारदार हस्तक्षेप करणार असल्याचे समजते. तिथे परमबीर आणि पुनमियावर गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे पुनमियाविरुद्ध हा बारावा गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्याच्याविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीसाठी धमकावणे, खंडणी गोळा करणे, फसवणूक असे विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, दोनच दिवसापूर्वी पुनामियाला  मुंबई उच्च न्यायालयानेही तूर्तास चार आठवड्यांचा दिलासा दिला आहे.

परमबीर यांचा उजवा हात

पुनमिया सध्या फरार असणारे आणि मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. पुनमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. ही जमीन पुनमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पुनमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे.

खोटी कागपत्रे जोडली

पुनमियाने जमीन खरेदीसाठी उत्तन (ठाणे) येथील खरेदी खताची कागदपत्रे जोडली होती. तीच त्याच्यासाठी अडचणीची ठरली आहेत. यातल्या पहिल्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्यात बाबुलाल अग्रवाल आणि त्यांच्या भावाचा सातबारा जोडल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या कागदपत्रांचा तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी तपास केला. तेव्हा त्या जमिनीचा मालकही पुनमिया नसल्याचे स्पष्ट झाले. एकंदर पुनुमियाने स्वतः बनावट कागदपत्रे सादर करून येथील जमीन खरेदी केल्याची प्राथमिकदृष्या समोर येत आहे.

सिन्नरमध्येही गोत्यात

विशेष म्हणजे या साऱ्या प्रकरणाची तक्रार आता सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन पाटील यांची ओळख एक कडक आणि खमक्या पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. एका आमदाराने त्यासाठी दबाव लावला होता, अशी चर्चा होती. त्यांच्या बदलीचे आदेशही आले होते. मात्र, नागरिकांचा वाढता रोष आणि हे प्रकरण मॅटमध्ये गेल्याने सध्या सचिन पाटीलच पोलीस अधीक्षकपदी आहेत.

इतर बातम्याः

साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; नाशिकमध्ये अशी रंगणार मैफल!

गुलाबी थंडीत नाशिकमध्ये राजकीय धग; निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रयोग जोरात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.