सावकारांच्या जाचाला कंटाळून दोघांची आत्महत्या, हातावर आरोपींच्या नावांचा उल्लेख, परभणीत खळबळ

परभणी जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी त्यांच्या हातावर सावकरांची नावे लिहून आत्महत्या केली आहे.

सावकारांच्या जाचाला कंटाळून दोघांची आत्महत्या, हातावर आरोपींच्या नावांचा उल्लेख, परभणीत खळबळ
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 6:10 PM

प्रशांत चलिंद्रवार,टीव्ही 9 मराठी, परभणी: परभणी जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी त्यांच्या हातावर सावकारांची नावे लिहून आत्महत्या केली आहे. अजय घुगे यांच्याकडून रितेश बंडू क्षीरसागर याने काही पैसे व्याजाने घेतले होते. त्याचे व्याज रोज शंभर रुपये त्याला द्यावे लागत होते. सावकारांनी व्याजाचा तगादा लावल्यानं दोघांनी आत्महत्या केली आहे. परभणीत या घटनेमुळं खळबळ माजली आहे.

व्याजासाठी तगादा

रितेश क्षीरसागर हा मिस्त्री काम करीत होता,त्याच्या हाताला काम नव्हते. रितेश काम नसल्यानं घेतलेल्या कर्जाचं व्याज शंभर रुपये देऊ शकत नव्हता. पण अजय घुगे, सुनील मुंडे, हनुमंत घुगे आणि ऋषी हे त्याच्याकडे रोज पैशांचची मागणी करीत त्याला मारण्याची धमकी देत होते. त्या कर्जाचा भार सहन होत नव्हता म्हणून त्याने आत्महत्या केली. अशी तक्रार रितेश क्षीरसागर याची आई मीरा क्षीरसागर यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मुद्दल न घेता व्याजसाठी तगादा लावल्यानं सुनील पारवे तणावात

सुनील पारवे हे होम थिएटर दुरुस्तीचे काम कराचे अजय घुगे यांनी होम थिएटर दुरुस्ती साठी पारवे यांना 5 हजार रुपये दिले होते. होम थिएटर दुरूस्ती ला वेळ लागत असल्याने आरोपी पारवे यांना त्रास देऊ लागले. त्यानंतर पैसे परत करण्याचे ठरले परंतू पैसे न घेता आरोपी दिलेल्या पैशावर व्याज मागत होते,मात्र पारवे यांच्या कडे तेवढे पैसे नसल्याने आरोपी त्यांना धमकी देत होते.

सावकाराच्या त्रासाला कंटाळून दोघांची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून या दोघांनी मृत्यू पूर्वी विषारी औषध प्राशन करून रितेश क्षीरसागर आणि सूनील पारवे हे दोघे सोनपेठ शहरातील बाबापिर रस्त्यावर बेशुद्ध पडले होते. त्यांना परळी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रितेश क्षीरसागर आणि सूनील पारवे यांच्या शव विच्छेदनात त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सोनपेठ पोलीस ठाण्यात कलम 306,504 भादवी 34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 39/45 सहकलम महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 याप्रमाणे सावकार अजय घुगे,सुनील मुंडे,हनुमंत घुगे आणि ऋषी कौडगावकर या चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. सोनपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता सावकारांवर काय कारवाई होणार याकडं जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या:

VIDEO : शेतकऱ्याकडून 3 हजारांची लाच मागणारा अधिकारी कॅमेऱ्यात कैद, बुलडाण्यातील धक्कादायक घटना

19 वर्षीय तरुणीच्या सोनोग्राफीचा बहाणा, बीडमधील ‘नगराध्यक्ष’ डॉक्टरने अश्लील चाळे केल्याचा आरोप

पुणे एसीबीची धडक कारवाई! महापालिकेत लाचखोरांची संख्या जास्त तर महसूल विभागात सर्वाधिक कारवाया

Parbhani Ritesh Kshirsagar and Sunil Parave committed suicide by drinking poison due to torcher of money lender Ajay Ghuge sonpeth police register case

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.