AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यादेखत लेकीचं अपहरण, माता-पित्यांना दुःख आवरेना, मग…

आई-वडिल आणि मुलगी आपल्या कारने चालले होते. यावेळी आरोपींनी भररस्त्यात त्यांची गाडी अडवली आणि मुलीचे अपहरण करुन पळाले. डोळ्यादेखत घडलेल्या घटनेने आई-वडिलांना दुःख आवरले नाही.

डोळ्यादेखत लेकीचं अपहरण, माता-पित्यांना दुःख आवरेना, मग...
अपहृत अल्पवयीन मुलीची मुंबई पोलिसांकडून सुटका
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 3:10 PM

नाशिक : भररसत्यात आई-वडिलांसमोर मुलीचे अपहरण केल्याची घटना रविवारी नाशिकमध्ये घडली. रविवारी दुपारी भरविहिर गावाकडे जात असताना घोटी हायवे जवळील वाजे पेट्रोल पंप समोर समाधान सोमनाथ झनकर आणि इतर साथीदारांनी पीडित कुटुंबाची गाडी अडवून आई बापासमोर मुलीला गाडीत बसवून घेऊन गेले. तरुण मुलीचे डोळ्यासमोर अपहरण झाल्याने मुलीच्या आई-वडिलांनी भगूर येथील नूतन शाळे मागे गोदान एक्स्प्रेससमोर येऊन आपले जीवन संपवले. यानंतर नातेवाईकांकडून आरोपीच्या घरासमोरच मयत दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे इगतपुरी, सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

नाशिकरोड लोहमार्ग पोलिसात आकस्मिक तर मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसात झनकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी भरविहिर येथील गावकरी आणि नातेवाईक यांनी पीडित दाम्पत्याचे मृतदेह ताब्यात घेऊन झनकर याच्या घरासमोर त्याच्या वर अंत्यसंस्कार केले. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोपी अद्याप फरार आहेत.

अंत्यसंस्कारप्रकरणी ग्रामस्थांवरही गुन्हा दाखल

अपहृत मुलीच्या आई-वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर अपहरण करणाऱ्या मुलावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम 306 अंतर्गत संशयित आरोपी समाधान झनकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलाच्या घरासमोर मुलीच्या आई वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या ग्रामस्थांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे अपहरण झाल्याने मुलीच्या आई वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. घटनेनंतर संशयित आरोपी अद्याप फरार आहे.

हे सुद्धा वाचा

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.