चांगला ठणठणीत होता, फक्त ताप आलेला, त्यांनी थेट त्याचं ऑपरेशन केलं, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने जीव घेतला
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाला ताप आला होता. त्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयातल्या निष्काळजी स्टाफ आणि डॉक्टरांमुळे या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाला ताप आला होता. त्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयातल्या निष्काळजी स्टाफ आणि डॉक्टरांमुळे या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कारण रुग्णालयातील डॉक्टरांनी कारण नसताना या रुग्णाचं ऑपरेशन केलं. खरंतर त्यांना दुसऱ्या एका रुग्णाचं ऑपरेशन करायचं होतं. पण निष्काळजीपणामुळे त्यांनी दुसऱ्याच कुणाचं ऑपरेशन केलं. त्यामुळे एका निष्पापाचा बळी गेला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बुलंदशहरच्या नरसेना पोलीस ठाणे हद्दीतील किरयारी गावात वास्तव्यास असलेलेल 44 वर्षीय युसूफ यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना ताप आलेला होता. त्यामुळे त्यांना जिल्हा मुख्यालयातील सुधीर नर्सिंग होम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खरंतर युसूफ यांची प्रकृती चांगलीच होती. पण उपचार करणाऱ्यांनी कारण नसताना त्यांचं ऑपरेशन केलं.
रुग्णाच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
रुग्णालय प्रशासनाने सुरुवातीला गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन असल्याचं म्हटलं. पण रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले. रुग्णालयाने युसूफ यांच्या शरीरातील अवयव काढण्यासाठी ऑपरेशन केले, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. दुसरीकडे या घटनेमागे दोन रुग्णांचं एकच नाव असल्याचं कारणही सांगितलं जातंय.
ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी रुग्णालयात गोंधळ
रुग्णालयातील डॉक्टरांनी 20 ऑक्टोबरला युसूफ यांची शस्त्रक्रिया केली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला. रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष पाहता रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर स्टाफ गायबच झाला होता. अखेर संध्याकाळी उशिरा रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलीस आणि आरोग्य विभागाला या प्रकरणी तक्रार केली.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, पण डॉक्टरांवर कारवाई केव्हा?
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. आरोग्य विभागाचे अधिकारी सुरुवातीला कठोर कारवाई करणार असल्याचं बोलत होते. पण नंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत आधी रुग्णालय सील केलं. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे. दुसरीकडे या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
हेही वाचा :