Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Patna Mother Murder | पोटच्या लेकानेच आईच्या अनैतिक संबंधांना कंटाळून घातल्या गोळ्या, बिहारमधील पाटण्यात कसा घडला विध्वंस?

4 जुलै रोजी रात्री इंदू देवी आपल्या बहीण आणि भाचीसोबत झोपल्या होत्या. रात्री 11 च्या सुमारास ओमप्रकाश टेरेसवरून खाली उतरला आणि आईच्या डोक्यात गोळी झाडून पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्वत: च्या आईवर गोळ्या झाडून तो गावातील मंदिरात बसला होता.

Patna Mother Murder | पोटच्या लेकानेच आईच्या अनैतिक संबंधांना कंटाळून घातल्या गोळ्या, बिहारमधील पाटण्यात कसा घडला विध्वंस?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 3:01 PM

बिहारची (Bihar) राजधानी पटना येथील पुनपुन पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरा गावात एक धक्कादायक घटना घडलीयं. पोटच्या लेकानेच आपल्या आईची हत्या (Murder) केलीयं. पिपरा गावात 4 जुलैच्या रात्री महिलेची हत्या करण्यात आली. 40 वर्षीय महिला इंदू देवी यांचे पती राम लड्डूसिंग यांनी 5 जुलै रोजी अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, मात्र जेव्हा पोलिसांनी तपास सुरू तेंव्हा समजले की, मुलानेच आपल्या आईची हत्या केलीयं. खतरनाक (Dangerous) बाब म्हणजे मुलाच्या काकानेच मारण्यासाठी हत्यार दिले होते.

पोटच्या मुलानेच आईला घातल्या गोळ्या

4 जुलै रोजी रात्री इंदू देवी आपल्या बहीण आणि भाचीसोबत झोपल्या होत्या. रात्री 11 च्या सुमारास ओमप्रकाश टेरेसवरून खाली उतरला आणि आईच्या डोक्यात गोळी झाडून पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्वत: च्या आईवर गोळ्या झाडून तो गावातील मंदिरात बसला होता. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर तो घरी परतला आणि आईला मिठी मारून रडू लागला.जो आईच्या हत्येनंतर जोर जोरात रडत होता, तिला मिठ्ठी मारून बसला होता. इतकेच नाही तर आईचे अंत्यसंस्कार विधी सर्व केले. याच मुलाला पोलिसांनी चोवीस तासात आईची हत्या केल्याप्रकरणी अटक केली. यामुळे सर्वांना आर्श्चयाचा मोठा धक्काच बसला आहे.

हे सुद्धा वाचा

हावभावावरून पोलिसांना त्याच्यावर संशय आला

ओमप्रकाशच्या हावभावावरून पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता. गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. आधी तो पोलिसांना फिरवत राहिला, पण चौकशी केली असता त्याने सगळा खुलासा केला. ओमप्रकाशने सांगितले की, तो गेल्या 2 वर्षांपासून त्याच्या आईच्या चारित्र्यामुळे त्रस्त होता. त्याच्या आईचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, त्यामुळे गावात लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचे, समाजात बदनामी व्हायची.

'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.