Pimpri Chinchwad crime |’प्रसिद्धीसाठी केला अट्टाहास’ आमदाराच्या बंधूंच्या कार्यालयावर फेकले पेट्रोल बॉम्ब , आरोपीची कबुली
या घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासाची सूत्रे वेगवान हालवत पोलिसांनी पिंपरी -चिंचवड शहरातून दोघांना तर शहराच्या बाहेरुन एकाला ताब्यात घेतले आहे.
पिंपरी- भाजपचं आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्या कार्यालयावर काल पेट्रोल बॉम्ब टाकल्याची घटना घडली होती. पिंपळे गुरव येथील पेट्रोलपंपाजवळ हे ‘चंद्ररंग’ डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. या घटनेमुळे शहरात मोठे खळबळ उडाली होती. या घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासाची सूत्रे वेगवान हालवत पोलिसांनी पिंपरी -चिंचवड शहरातून दोघांना तर शहराच्या बाहेरुन एकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती दिली आहे.
आरोपीना अटक केली असली तरी कायदेशीरबाबी अद्याप शिल्लक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलयानंतरच नेमके खरे कारण समोर येईल, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिली आहे.
आरोपीच्या शोधासाठी केली नाकाबंदी
घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली होती. इतकेच नव्हेत तर शहराच्या काही भागात नाका बंदीही करण्यात आली होती.
अशी घडली घटना काल दुपारी पावणे तीनच्या सुमारास हे घटना घडली . एका दुचाकी वाहनावरून तिघेजण आले . ते तिघे जगताप यांच्या कार्यालयासमोर थांबले. त्यातील दोघांनी कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलने भरलेल्या पेटत्या बाटल्या फेकल्या आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले.
Video: सिंहाच्या पिंजऱ्याच्या दगडावर जाऊन बसला, सिंह पकडणार तोच…पाहा हादरवणारा व्हिडीओ!
Astro Remedy | गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाचे चमत्कारिक उपाय, दूर होतील सर्व दु:ख
कपिल शर्मा शोच्या सेटवर स्मृती इराणींना ‘नो एंट्री’! पाहा नेमकं काय घडलं?