परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपांचीही चौकशी होणार

परमबीर सिंग हे अंडरवर्ल्डमधील काही गुंडांच्या सेटिंगचं काम पाहत असत. क्राईम ब्रांचमार्फत ते डील करत होते, असा आरोप अनुप डांगे यांनी केला होता (PI Anup Dange Parambir Singh )

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपांचीही चौकशी होणार
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 10:47 AM

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविषयीची आणखी एक चौकशी सुरु झाली आहे. पोलिस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) या प्रकरणाची चौकशी करुन आपला अहवाल सादर करतील. गावदेवी पोलिस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अनुप डांगे (Anup Dange) यांच्या आरोपांनंतर ठाकरे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. (PI Anup Dange accusations on Parambir Singh Enquiry begins by DG Sanjay Pandey)

अनुप डांगे यांचे आरोप काय?

गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या अनुप डांगे यांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहून परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अनुप डांगे यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये एका पबवर छापा टाकताना पबचे मालक जीतू निवलानी यांनी परमबीरसिंग यांच्याशी संबंध असल्याची धमकी दिली होती.

विरोधात पुरेसे पुरावे नसले तरी केस तयार केली म्हणून संबंधित व्यावसायिकाविरुद्ध खटला भरण्यासाठी विभागीय कार्यवाही करत असताना आपल्याला निलंबित करण्यात आले होते, असा दावा अनुप डांगे यांनी केला. अनुप डांगे यांच्या दाव्यानुसार त्यांना पब मालकाच्या सांगण्यावरुन परमबीर सिंग यांनीच अडकवलं होतं.

परमबीर यांच्या निकटवर्तीयाकडून दोन कोटींची मागणी

परमबीर सिंग हे अंडरवर्ल्डमधील काही गुंडांच्या सेटिंगचं काम पाहत असत. क्राईम ब्रांचमार्फत ते डील करत होते, असा आरोप अनुप डांगे यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करण्यासाठी 2 कोटींची मागणी केल्याचाही दावा डांगेंनी केला होता.

परमबीर सिंग यांचा पाय खोलात

सध्या अनुप डांगे यांना गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये पुन्हा रुजू करण्यात आलं आहे. अनुप डांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने डीजी संजय पांडे यांना दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वतीने परमबीर सिंग यांच्याविषयीचे चौकशीचे हे दुसरे प्रकरण आहे, ज्यामध्ये तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी अँटिलिया टेरर प्रकरणात तपासाची दिशाभूल केल्याबद्दल परमबीर सिंग यांच्याविरोधत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

परमवीर सिंगांच्या सूचनेने वाझेंकडे हायप्रोफाईल केसेस, नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासे

परमबीर सिंग NIA कार्यालयात, वाझेंची नियुक्ती ते हायप्रोफाईल तपास, चौकशीत 9 महत्त्वाच्या प्रश्नांवर भर

(PI Anup Dange accusations on Parambir Singh Enquiry begins by DG Sanjay Pandey)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.