आमदार आण्णा बनसोडेंच्या मुलासह 4 आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी, आतापर्यंत 13 आरोपींना अटक

तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदार आण्णा बनसोडेंच्या मुलासह 4 आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी, आतापर्यंत 13 आरोपींना अटक
आमदार आण्णा बनसोडे (उजवीकडे), मुलगा सिद्धार्थ बनसोडे
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 5:59 PM

रत्नागिरी : पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सिद्धार्ध बनसोडेसह 4 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत आतापर्यंत सिद्धार्थ बनसोडे याच्यासह 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. (MLA Anna Bansode’s son Siddharth Bansode have been remanded in police custody)

पिंपरी-चिंचवडमधील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिस सिद्धार्थ बनसोडेचा शोध घेत होते. त्यानंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली .

सिद्धार्थ बनसोडेवर मारहाणीचा गुन्हा

चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. तिथल्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोखंडी रॉडसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत याबाबत कर्मचाऱ्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे सिद्धार्थ बनसोडे, त्यांच्या पीएसह 10 जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर 12 मे रोजी गोळीबार झाला होता. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली होती. ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. या गोळीबारात कोणालाही जखम झालेली नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पुण्यात तरुणावर टोळक्याचा कोयता हल्ला, शेजारच्या रहिवाशांनी घरात घेतल्याने तरुण बचावला

MLA Anna Bansode’s son Siddharth Bansode have been remanded in police custody

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.