सोशल मीडियावरील कोयता भाईला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या

अशाच पद्धतीने समाजात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील इन्स्टाग्रामवर कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला गुंडविरोधी पथकाने अटक केली.

सोशल मीडियावरील कोयता भाईला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
police handcuff Koyata Bhai
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 11:22 PM

पिंपरी-चिंचवडः सध्या सोशल मीडियावर भाऊ, भाई, दादा अशा लोकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते. अनेक जण विविध प्रकारचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर पोस्ट करत असतात, त्यापैकी काही व्हिडीओ चांगल्या संदेशाचे असतात, तर काही समाजात भीती पसरविण्याचे काम देखील करत असतात. अशाच पद्धतीने समाजात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील इन्स्टाग्रामवर कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला गुंडविरोधी पथकाने अटक केली. राकेश सरोदे उर्फ यम भाई असं या तरुणाचे नाव आहे. (Pimpri Chinchwad police handcuff Koyata Bhai on social media)

तो स्वतःला कोयता भाई असल्याचं सांगतो

तो स्वतःला कोयता भाई म्हणून इन्स्टाग्रामवर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात प्रसारित करत होता. या कोयता भाईच्या हातात कोयता घेऊन प्रदर्शन करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या व्हिडीओमध्ये कोयता हातात घेऊन दहशत पसरवण्यासाठी “आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात.” तसेच हातात कोयता घेत “वेळ आली की मी कोण आहे हे दुनियाला सांगायची आणि मी काय करू शकतो, असे म्हणून कोयता दाखवत या राकेश सरोदे ऊर्फ यम भाईने दहशत पसरवण्यासाठी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. याची गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी या यम भाईला अटक करत त्याची मस्ती उतरवलीय.

एका व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये तीन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर असताना अशा प्रकारे घातक हत्यारांचा प्रदर्शन हे सोशल मीडियावरील भाई करत आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण हे दूषित होत चालेल आहे. मात्र या सोशल मीडियावरील दहशत माजवणाऱ्या व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या भाई लोकांवर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलीय.

संबंधित बातम्या

VIDEO : गुन्हेगाराला केक भरवताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनेकांकडून कारवाईची मागणी, व्हिडीओ व्हायरल

लस न घेताच अ‍ॅपवर लसीकरणाचं सर्टिफिकेट, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

Pimpri Chinchwad police handcuff Koyata Bhai on social media

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.