सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दुग्धजन्य पदार्थांमधून विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील वरवडे गावातील ही घटना आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण वय सात व नम्रता आबासाहेब चव्हाण वय चार अशी मृत बहिणींची नावे आहेत. एकाच घरातील दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील वरवडेमध्ये चव्हाण कुंटब राहाते. आबासाहेब चव्हाण यांना दोन मुली होत्या. या दोन्ही बहिणींनी दूध डेरीमधून आणलेले पनीर, श्रीखंड आणि बासुंदी खाल्ली होती. हे पदार्थ खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना त्रास होऊ लागला. त्रास वाढल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणाची अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली असून, अन्न भेसळ व प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आबासाहेब चव्हाण यांच्या घराला भेट दिली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, संबंधित पदार्थांमध्ये भेसळ आहे की नाही हे तपासण्यासाठी ते ताब्यात घेण्यात आले आहे. अहवाला आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बहुचर्चीत पालममधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; फाटलेला नोटा आणि पेटीएममुळे आरोपीला अटक
मोफत जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण; अखेर ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित
NMC Scam | स्टेशनरी घोटाळा : साकोरे कुटुंबीयांना 40 वर्षांपासून कंत्राट; पाच नव्हे सात कंपन्या!