धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात घुसल्या, 24 महिलांना सत्संगानंतर अटक; चोरीची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलीस…
पटनामध्ये दोन दिवसांपूर्वी बागेश्वर बाबांचा दिव्य दरबार भरला. या दरबारात सुमारे दहा लाख लोक सामील झाले होते. बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यातून लोक आले होते. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह नेपाळमधूनही लोक आले होते.
पटना : पटनाच्या नौबतपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे महाराज पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार पार पडला. यावेळी भक्तांची प्रचंड गर्दी झाली. बाबाच्या दरबारात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भक्तांना पाहून सोनसाखळ्या चोरणारी टोळीही सक्रीय झाली. अन् या टोळीने मोठ्या प्रमाणावर चोरी केली. या चोरीच्या तक्रारी आल्यानंतर पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी या सोनसाखळी चोरणाऱ्या 24 महिला चोरांना अटक केली. या महिलांना अटक केल्यानंतर त्यांची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलीसही अवाक् झाले.
सोन साखळी चोरणाऱ्या टोळीतील या महिला आधी गर्दीत भक्त म्हणून सामील व्हायच्या. अन् संधी मिळताच हाथ की सफाई करायच्या. या महिला यज्ञ स्थळ आणि बडे मेलामधून जाऊन चोरी करायच्या. चोरी करण्याची त्यांचीही पद्धत ऐकून पोलीसही आवाक् झाले. या महिलांवर कलम 109 लावण्यासाठी पोलिसांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या तरी बागेश्वर बाबांचा दरबार बंद ठेवण्यात आला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पुन्हा बाबाचा दरबार भरल्यास त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आवर घालणं कठिण
बागेश्वर बाबांची कथा ऐकण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लोक आले होते. या कार्यक्रमाला सुमारे 10 लाख लोकांची गर्दी होती असं सांगितलं जातं. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणआवर गर्दीला आवर घालणंही आयोजकांना कठीण गेलं. त्यातच भक्तांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे बागेश्वर बाबांनी पुढचा कार्यक्रम रद्द केला.
रात्रभर बाबा थांबले
दिव्य दरबार संपल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी झाली होती की पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे कार्यक्रमात धावपळ उडाली आहोती. बिहारमधील सर्व जिल्ह्यातून लोक आले होतेच. शिवाय झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशासह नेपाळमधूनही लोक बाबांना ऐकण्यासाठी आले होते. काही भक्त तर बाबांचं दर्शन घेण्यासाठी रात्रभर थांबले होते.