Mumbai Crime : चोरांनी काय शक्कल लढवली बघा, मुंबईत बाईक चोरी आणि जालन्यात विक्री, तरीही पोलिसांनी मुसक्या आवळल्याच
झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, बाबासाहेब नाना खरात आणि शंकर माणिक मगरे अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून दोघेही देवलगाव जालना येथील रहिवासी आहेत.
मुंबई : मुंबईतील (Mumbai) समतानगर पोलिसांनी दादर येथील स्वामी नारायण मंदिराजवळून नऊ चोरीच्या दुचाकींसह सख्या दोन मेव्हण्याला अटक केलीयं. हे आरोपी जालना येथून दुचाकी चोरून मुंबईत विकायचे आणि मुंबईतून दुचाकी चोरून महाराष्ट्रातील जालना आणि औरंगाबाद (Aurangabad) येथील शेतकऱ्यांना विकायचे अशी धक्कादायक माहिती पुढे आलीयं. मुंबईतील विविध ठिकाणांहून चोरलेल्या नऊ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान मुंबईतील रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी चोरून महाराष्ट्राच्या (Maharashtra) विविध भागात विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळालीयं.
झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिली महत्वाची माहिती
झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, बाबासाहेब नाना खरात आणि शंकर माणिक मगरे अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून दोघेही देवलगाव जालना येथील रहिवासी आहेत. तपासादरम्यान मुंबईतील रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी चोरून महाराष्ट्राच्या विविध भागात विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीयं.
दोन्ही आरोपी एकमेंकांचे सख्ये मेहूनेच असल्याची धक्कादायक माहिती
विशेष बाब म्हणजे हे दोन्ही आरोपी एकमेंकांचे सख्ये मेहूनेच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीयं. हे दोघे मुंबईमध्ये रस्त्यावर लावल्यात आलेल्या दुचाकी चोरून मराठवाड्यातील विविध गावांमध्ये त्याची विक्री करत असत. इतकेच नाही तर ते जालना आणि औरंगाबाद येथून देखील दुचाकी चोरी करून त्याची विक्री मुंबईमध्ये करत असत. या आरोपींकडून पोलिसांना चोरीचा तब्बल 9 दुचाकी मिळाल्या आहेत.