Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fahim Khan : फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, नागपूर राडा तपासात हादरवून टाकणारी माहिती आली समोर

Fahim Khan : नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला होता. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा संघर्ष उफाळला. दोन गटात राडा झाला. या प्रकरणात फहीम खान मास्टरमाइंड असल्याच समोर आलय. त्याच्या विरोधात पोलिसांनी मोठ पाऊल उचललं आहेच. पण तपासातून हादरवून टाकणारी माहिती समोर आली. हिंसाचाराला कारणीभूत ठरणारे व्हिडिओ कुठून आले? कुठल्या देशाच कनेक्शन समोर आलय? त्या बद्दल जाणून घ्या.

Fahim Khan : फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, नागपूर राडा तपासात हादरवून टाकणारी माहिती आली समोर
FAHIM KHAN
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 8:23 AM

नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यातून तुफान दगडफेक झाली. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. जाळपोळ झाली. अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले. या हिंसाचारामुळे नागपूरच्या अनेक भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. नागपूरमधील या राडा प्रकरणात फहीम खान हे नाव समोर आलय. फहीम खान या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फहीम खानसह 50 आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. या हिंसाचाराच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बांग्लादेशातील दहशतवादी संघटनेचा या नागपूर राडा प्रकरणात सहभाग असल्याच समोर आलय.

किती व्हिडिओ पोलिसांना सापडले?

नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले आहेत. बांग्लादेश आणि इतर देशातील IP अड्रेसवरुन हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. 172 व्हिडिओंचा IP अड्रेस आणि मोबाइल नंबरचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

काय आहे मालेगाव कनेक्शन?

नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानच मालेगाव कनेक्शन समोर आलं आहे. फहीम खान पाच महिन्यांपूर्वी मालेगावात येऊन गेल्याच समोर आलय. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. MDP पार्टी काढून मालेगाव मध्य मधून मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.

कोण आहे फहीम खान?

फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. इयत्ता दहावीपर्यंत फहीम खान याचं शिक्षण झालय. सध्या तो 38 वर्षांचा आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याला 1 हजार 73 मतं मिळाली होती. फहीम खानने नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप केला जात आहे.

तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?.
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा.