औरंगाबादः मुकुंदवाडीतील तरुणीचा नोकरानेच केला खून, प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचे उघड

औरंगाबादमध्ये मुकुंदनगर परिसरात एका मोकळ्या मैदानात तरुणीचा मृतदेह आढळला होता. ही हत्या त्यांच्या घरी राहणाऱ्या नोकरानेच केल्याचे उघड झाले आहे. मयत तरुणी आणि भोला नावाच्या या आरोपीचे प्रेमसंबंध होते.

औरंगाबादः मुकुंदवाडीतील तरुणीचा नोकरानेच केला खून, प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचे उघड
आरोपी भोलाकुमार आणि मयत इंदू राय
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 1:39 PM

औरंगाबादः शहरातील मुकुंदनगरमधील (Mukundnagar) एका तरुणाची अज्ञाताने खून केल्याची घटना काल दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या खूनाचा उलगडा झाला असून त्यांच्याच घरातील एका नोकराने तरुणीचा खून केल्याचे उघड झाले आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी (Aurangabad police) 24 तासांच्या आत या खूनाचा छडा लावला असून आरोपीला लोणावळ्यात अटक केली.

तरुणीसोबत होते प्रेमसंबंध

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूर येथील बरखू सराय हे औरंगाबादमध्ये उदरनिर्वाहासाठी आले होते. त्यांनी सात वर्षआंपूर्वी गावातील भोलाकुमार कुंजन मास्टर कुमार याला प्लंबिंगचे काम करण्यासाठी सोबत आणले व घरीच ठेवले होते. मात्र बरखू यांनी मुलगी इंदूसोबत दोन वर्षांपूर्वी त्याचे प्रेमसंबंध जुळले. इंदूच्या भावाला हे समजल्याने त्याने भोलाकुमारला दोन महिन्यांपूर्वी घराबाहेर काढले. त्याला राजनगरमध्ये भाड्याने खोली घेऊन दिली. त्यानंतर इंदूने त्याचा मोबाइल ब्लॉक केला होता.

ती कुणाशी फोनवर बोलतेय..म्हणून होता अस्वस्थ

दरम्यान भोला इंदूच्या घरी काही कामानिमित्त गेल्यानंतरही ती कुणाशी तरी फोनवर बोलताना त्याला दिसत असे. त्यामुळे भोलाकुमार अस्वस्थ होता. त्याने सोमवारी रात्री 7 वाजता इंदूला त्याच्या खोलीवर बोलावून घेतले. तेथे तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर भोलाकुमारने इंदूच्या भावाला फोन करून ती मुकुंदवाडी गेट 56 परिसरात एका मुलाच्या गाडीवर बसून जाताना दिसल्याची थाप मारली. त्यानंतर भावासोबत जाऊन इंदूचा शोधही घेतला. अखेर रात्री 11 वाजता मुकुंदवाडीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या भावाला भोलानेच अडवले. मंगळवारी तक्रार देण्याचे ठरवले.

मृतदेह राजनगरात सोडून पुण्याला पळ

भोलाने बरखू यांच्या घरी जाऊन दुचाकी आणली. त्याच दुचाकीवरून इंदूचा गादीत गुंडाळलेला मृतदेह राजनगरात आणून टाकला. दुसऱ्या दिवशी भोलाकुमार पुण्याला पळून गेला. मंगळवारी इंदूचा भाऊ तक्रार देण्यासाठी ठाण्यात आला तेव्हा त्यांना मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्याने मृतदेह पाहून त्याची खातरजमा केली. इंदूच्या कुटुंबाने भोलावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी रातोरात भोलाचा पाठलाग करत लोणावळ्यात त्याला अटक केली.

इतर बातम्या- 

Crime: गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या, मित्रानेच वादातून केला खून, औरंगाबादेत थरार!

औरंगाबादः 8 वर्षीय मुलीच्या आत्महत्येचे गूढ उकलले, पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापानेच केली हत्या!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.