पिकअपमध्ये खचाखच स्फोटक भरलेले, आरोपींचा नेमका प्लॅन काय? झारखंडमध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई

झारखंडमध्ये पोलिसांना स्फोटकांनी भरलेली गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी नाकाबंदी करुन स्फोटकांनी भरलेली एक पिकअप गाडी पकडली (Police seize pickup van full of explosives in Jharkhand).

पिकअपमध्ये खचाखच स्फोटक भरलेले, आरोपींचा नेमका प्लॅन काय? झारखंडमध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई
Crime News
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 3:10 PM

रांची : मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर दोन महिन्यांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. आता तशाच घटनेची पुनरावृत्ती झारखंडमध्ये झाली आहे. मात्र, या दोन भिन्न अशा घटना आहेत. मुंबईतल्या घटनेमागील कारण वेगळं असू शकतं. तर झारखंडमधील घटनेचं कारण वेगळं असू शकतं. झारखंडमध्ये पोलिसांना स्फोटकांनी भरलेली गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी नाकाबंदी करुन स्फोटकांनी भरलेली एक पिकअप गाडी पकडली. ही गाडी नेमकी कुठून कुठे जात होती, याबाबतची माहिती अजून पोलिसांनी मिळालेली नाही (Police seize pickup van full of explosives in Jharkhand).

पिकअपमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोटकं

झारखंडच्या दुमका या भागात पोलिसांनी रात्री उशिरा बेदिया पूल येथे संबंधित कारवाई केली. पिकअप गाडीत मोठ्या प्रमाणात खचाखच स्फोटक भरले होते. यामध्ये 2000 पीस डेटोनेटटर, 2000 जिलेटिनच्या काड्या, 43 पोतंभरुन अमोनियम नायट्रेट यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व स्फोटकं जप्त केली आहेत.

गाडीच्या ड्रायव्हरला अटक

पोलिसांना घाबरुन गाडीचा ड्रायव्हर आणि किन्नर पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी तसा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी त्या दोघांना पकडलं. यावेळी ते दोघं थोडे जखमी झाले. दोघावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती

झारखंडच्या मुफसिल पोलीस ठाण्याचे एसडीपीओ विजय कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईबाबत माहिती दिली. आम्हाला गुपित माहिती मिळाली की, मसलियाच्या रस्त्याने अवैध स्फोटकांनी भरलेली गाडी जाणार आहे. त्यानंतर आम्ही बेदिया पुलावर नाकाबंदी सुरु केली. या दरम्यान रात्री उशिरा एक बोलेरो पिकअप पकडली. या गाडीत प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती, अशी माहिती विजय कुमार यांनी दिली.

या पिकअपचा ड्रायव्हर अफजल अंसारी आणि त्याचा जोडीदार श्मसुद्दीन याला अटक करण्यात आली आहे. धावण्याच्या भानगडीत ते जखमी झाले आहेत. त्यांना डीएसीएच येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. स्फोटकांचा काळाबाजार करणारी टोळी सरगना देवघर येथे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी छापेमारी सुरु आहे, असं डीएसपीडीओ विजय कुमार यांनी सांगितलं (Police seize pickup van full of explosives in Jharkhand).

हेही वाचा : नागपुरात ‘लेडी डॉन’ची हत्या, भरचौकात चाकूचे सपासप वार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.