वर्दीत दारु पिऊन हाणामारी करणाऱ्या पोलिसावर कारवाई, मात्र गुन्हा दाखलच नाही, कारण…

जळगावात एका बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाली होती. हे पोलिस कर्मचारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील असल्याचे समोर आले. त्याविषयी अहवाल पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाला.

वर्दीत दारु पिऊन हाणामारी करणाऱ्या पोलिसावर कारवाई, मात्र गुन्हा दाखलच नाही, कारण...
जळगावात हाणामारी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 4:01 PM

किशोर पाटील, जळगाव | जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनी दारु पिऊन जळगावात धिंगाणा केला होता. पोलिसामधील हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जळगाव पोलीस दलातील कर्मचाऱ्याने वर्दीत बारमध्ये मद्यपान केले. त्यानंतर बारबाहेर येऊन हाणामारी केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चौकशी केली. त्यात दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर असे त्याचे नाव आहे. परंतु या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नाही. कारण यासंदर्भात कोणाची तक्रार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलीस कर्मचारी निलंबित

जळगावात गणवेशातच हॉटेलात मद्यपान करून दारूच्या नशेत हाणामारी करण्याचा प्रकार घडला होता. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर हा या प्रकारात दोषी आढळून आला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी संदीप धनगर याच्या निलंबनाचे आदेश काढले.

काय घडला होता प्रकार

गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाले होते. दोन पोलिसांमधील हाणामारीचा हा व्हिडिओ समोर आला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर याला निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. या प्रकरणात संबंधिताची चौकशी करण्यात येणार आहे. निलंबन काळात संदीप धनगर याला मुख्यालयात रहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

रविवारी 25 ऑगस्ट रोजी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाली होती. हे पोलिस कर्मचारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील असल्याचे समोर आले. त्याविषयी अहवाल पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाला. गणवेशात मद्यपान केल्याचा ठपका ठेवून धनगर याला निलंबित करण्यात आले. आता या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येणार आहे. फिर्यादी नाही…म्हणून गुन्हा नाही

दरम्यान, या प्रकरणी कोणाची तक्रार दिली नाही. यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. कोणाची फिर्याद आली तर योग्य ते कलम लावून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

हे ही वाचा…

बारमध्ये वर्दीवर दोन पोलीस तर्रर्र…मग दोघं पोलिसांमध्येच…व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.