अरुण राठोडची नार्को चाचणी करा, पूजाच्या कुटुंबीयांचे कॉल डिटेल्स तपासा, चुलतआजीची मागणी

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संशयित अरुण राठोडला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे (Pooja Chavan Grandmother Narco test)

अरुण राठोडची नार्को चाचणी करा, पूजाच्या कुटुंबीयांचे कॉल डिटेल्स तपासा, चुलतआजीची मागणी
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 1:28 PM

बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) अरुण राठोडची नार्को चाचणी करा, अशी मागणी पूजाच्या चुलत आजीने केली आहे. पूजाच्या कुटुंबाीयांचे मोबाईल डिटेल्स तपासा, यात कोण दबाव टाकतोय स्पष्ट होईल, असं शांताबाई राठोड म्हणाल्या. (Pooja Chavan Grandmother demands Arun Rathod Narco test in Suicide Case)

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संशयित अरुण राठोडला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. “अरुण राठोडची नार्को चाचणी करा. पूजाला न्याय मिळाला पाहिजे, दोषी कोणीही असो. अरुण राठोड किंवा कोणीही, त्याला शिक्षा झाली पाहिजे” अशी मागणी शांताबाई राठोड यांनी केली.

“अरुण राठोड आणि पूजाच्या घरच्यांचेही कॉल डिटेल्स तपासा. तपासणीनंतर स्पष्ट होईल की कोणाचे फोन येतात, कोणाचे दबावाचे फोन येतात का, कुणी ब्लॅकमेल किंवा देण्याघेण्याचं बोलायला फोन करतं का” याकडे शांताबाई राठोड यांनी अंगुलीनिर्देश केला.

“दोषींची नावं सगळ्यांना माहित आहेत. एक जण ताब्यात घेतल्यावर त्याची सखोल चौकशी केल्याशिवाय पोलिसांनी सोडू नका, ही विनंती आहे. विलास असो किंवा अरुण असो, अरुणचा रोल काय आहे. नेत्यासोबत बोलतोय मित्रासारखा, त्याचा रोल काय आहे?” असा सवाल शांताबाई राठोड यांनी विचारला.

अरुण राठोड ताब्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला (Arun Rathod) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. याप्रकरणात एकूण तीन पथकं चौकशी करत आहेत. याअगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस दप्तरी आहे.

पूजा अरुण राठोडचा गर्भपात

दरम्यान, काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला होता. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.  (Pooja Chavan Grandmother demands Arun Rathod Narco test in Suicide Case)

संबंधित बातम्या :

पूजा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती, तिचे आईवडील गप्प का?; चुलत आजीचे सवाल

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(Pooja Chavan Grandmother demands Arun Rathod Narco test in Suicide Case)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.