पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट
राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. (pooja chavan suicide case: postmortem report showing cause of death)
पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. पुणे पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पाचारण केलं. दीपक लगड यांच्याकडून हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. (pooja chavan suicide case: postmortem report showing cause of death)
पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. मात्र 7 फेब्रुवारीला तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.
मुख्यमंत्र्यांने दखल घेतल्यानंतर चक्रे फिरली?
पूजा चव्हाण प्रकरणात विरोधी पक्षाने ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची कालच संपूर्ण माहिती घेतली होती. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना याप्रकरणाची माहिती दिली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली असून मुख्यमंत्र्यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतल्याने ज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नेमकं प्रकरणं काय?
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.
भाजपकडून थेट वन मंत्र्याचं नाव
भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.
फडणवीसांचं पोलीस महासंचालकांना पत्रं
पूजाच्या आत्महत्येनंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या:
Pooja Chavan Suicide Case Live Updates : संजय राठोड प्रकरणावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
(pooja chavan suicide case: postmortem report showing cause of death)