वाझे प्रकरणात जप्त कारचे मूळ मालक शिवसेना पदाधिकारी, दोन वर्षांपूर्वीच गाडी विकल्याचा दावा

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाच्या तपासादरम्यान MH 02 CC 0101 क्रमांकाची प्रॅडो (Prado) गाडी जप्त करण्यात आली (Prado Vijaykumar Bhosle Shivsena )

वाझे प्रकरणात जप्त कारचे मूळ मालक शिवसेना पदाधिकारी, दोन वर्षांपूर्वीच गाडी विकल्याचा दावा
सचिन वाझे आणि मनसुख हिरेन
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 9:57 AM

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या प्रॅडो कारचे मूळ मालक विजयकुमार भोसले (Vijaykumar Bhosle) हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. विजयकुमार भोसले हे मुंबईतील चारकोप विधानसभेचे उपविभाग प्रमुख आहेत. याच गाडीतून स्वतः सचिन वाझे हे मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांना घेऊन सीपी ऑफिसला आले होते. (Prado Car detained in Ambani Bomb scare owner Vijaykumar Bhosle Shivsena official)

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाच्या तपासादरम्यान MH 02 CC 0101 क्रमांकाची प्रॅडो (Prado) गाडी जप्त करण्यात आली आहे. तिची मालकी दोन वर्षांपूर्वी विजयकुमार भोसले यांच्याकडे होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही कार विकल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे.

गुहागर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक

विजयकुमार भोसले यांनी 2014 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते भास्कर जाधव यांनी भोसलेंचा पराभव केला होता. गुहागरची हीच जागा 2009 मध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांनी लढवली होती. त्यावेळी तेही भास्कर जाधव यांच्याकडून पराभूत झाले होते. 2019 मध्ये स्वतः भास्कर जाधव हेच शिवसेनेत आले आणि निवडून आले.

कोण आहेत विजयकुमार भोसले?

-विजयकुमार भोसले हे मुंबईतील चारकोप विधानसभेचे उपविभाग प्रमुख -2014 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक -वाझे प्रकरणात जप्त झालेल्या प्रॅडो कारचे मूळ मालक

विजयकुमारांचे पुतणे मनसेतून शिवसेनेत

विजयकुमार भोसले यांचे पुतणे दीपक भोसले हे अनेक वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय होते. मात्र काही दिवसांपूर्वी डोंबिवलीचे मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

‘ती’ प्रॅडो OLX वर विकली

भोसले यांनी ही प्रॅडो गाडी दोन वर्षांपूर्वी OLX वर विकल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. याबाबत आज त्यांना कांदिवली पोलिसांनी स्टेटमेंट द्यायला बोलावलं आहे. मात्र स्टेटमेंट कांदिवली पोलीस स्टेशनला होणार की सीपी ऑफिसला हे अद्याप स्पष्ट नाही.

मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. सध्या NIA कडून सचिन वाझेंची झाडाझडती घेतली जात आहे. NIA ने आतापर्यंत पाच महागड्या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या दोन मर्सिडीज कारचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पाच गाड्यांपैकी एक गाडी ही नवी मुंबईची नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे.

एक गाडी नवी मुंबईची नोंदणीकृत

NIA ने केलेल्या कारवाईत 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहे. यात 1 स्कॉर्पिओ, 1 प्रॅडो, 1 इनोव्हा आणि 2 मर्सिडीज या गाड्यांच्या समावेश आहे. यातील एक गाडी ही नवी मुंबईची नोंदणीकृत आहे. MH 43 AR 8697 असा या मर्सिडीज गाडीचा नंबर आहे. ही गाडी नवी मुंबईतील वाशी (सानपाडा) येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत असल्याचे समजते. (Prado Car detained in Ambani Bomb scare owner Vijaykumar Bhosle Shivsena official)

या काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीचे 18 फेब्रुवारी रजिस्ट्रेशन झाले होते. तर 15 फेब्रुवारीला या गाडीची खरेदी करण्यात आली होती. ही गाडी नर्मदा ऑफशोर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमीटेडच्या या कंपनीच्या नावे रजिस्ट्रेशन असल्याची  माहिती समोर येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता.

संबंधित बातम्या :

सचिन वाझे प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन, सापडलेल्या 5 गाड्यांपैकी एक गाडी नवी मुंबईतील

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, कांदिवली क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाची ATS कडून चौकशी

(Prado Car detained in Ambani Bomb scare owner Vijaykumar Bhosle Shivsena official)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.