अगोदर केली मारहाण, थेट गाडीने उडवले आणि मला मरण्यासाठी रस्त्यावर फेकले, भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षावर अत्यंत गंभीर आरोप
एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर सर्वजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. एक बड्या अधिकाऱ्याच्या मुलावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत असून हे पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
मुंबई : भाजपच्या पालघर युवा मोर्चाच्या अध्यक्षाने थेट त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. त्याची प्रेयसी गेल्या सहा दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत आहे. इतकेच नाही तर तिच्या शरीरावर असंख्य जखमा देखील आहेत. प्रेयसीला गाडीने उडवणारा आणि तिच्या हाताला चावा घेणारा अश्वजीत गायकवाड हा फक्त भाजपच्या पालघर युवा मोर्चाच्या अध्यक्षच नाही तर त्याचे वडील हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. आता नुकताच या प्रकरणात अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय.
पीडित तरुणी प्रिया सिंह हिने आता काही गंभीर आरोप केले आहेत. प्रिया सिंह हिने थेट म्हटले की, मी केलेली FIR बदलण्यात आली. प्रिया सिंह हिने इंस्टाग्रामवर नेमके काय घडले हे सांगितले आहे. प्रिया सिंह म्हणाली की, मी गेल्या सहा दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत आहे. मुळात म्हणजे मला अगोदर हे अजिबातच माहिती नव्हते की, अश्वजीत गायकवाड याचे लग्न झालेले आहे.
मला काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाबद्दल कळाले. त्यावेळी मी त्याला त्याबद्दल विचारणा केली तर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने मला सांगितले की, त्याचा घटस्फोट झाला आहे. मात्र, त्यादिवशी त्याने मला संध्याकाळी सांगितले की, तो त्याच्या एका मित्राच्या संगीतमध्ये आहे. त्यानंतर मी तिथे पोहचले.
मी ज्यावेळी त्या संगीतच्या कार्यक्रमात पोहचले तर तिथे तो त्याच्या पत्नीसोबत मला दिसला. त्याच्या पत्नीसोबत त्याला पाहून मी हैराण झाले. मला तिथे पाहून अश्वजीत गायकवाड याला खूप मोठा धक्का बसला. मात्र, तिथे मी त्याला काहीच बोलले नाही. मी तिथून बाहेर गेले आणि रडत बसले. ज्यावेळी तो बाहेर पडत होता, त्यावेळी मी त्याला म्हटले की, तू मला असे सोडून जाऊ शकत नाही.
अश्वजीत गायकवाड आणि त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र नशेमध्ये होते. मी ज्यावेळी त्याला विचारणा केली की, तो मला खोटे का बोलला त्यावेळी त्याने मला शिवीगाळ करत धमकी दिली. त्यांनी मला मारहाण केली आणि मरण्यासाठी रस्त्यावर सोडून दिले. मला कारने उडवले देखील हे सर्व रात्री तीन वाजता घडले. मला साडेचार वाजता रूग्णालयात नेण्यात आले.
या मारहाणीमध्ये प्रिया सिंह हिची तीन पायाती हाडे तुटली असून तिची सर्जरी करण्यात आलीये. प्रिया सिंह हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये तिच्या शरीरावर मोठ्या जखमा या दिसत आहेत. प्रिया सिंह हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्रिया सिंह हिने अनेक गंभीर आरोप केले आहेत.